'गरज पडली तर शरद पवार भाजपलाही पाठिंबा देऊ शकतात'

'गरज पडली तर शरद पवार भाजपलाही पाठिंबा देऊ शकतात'

देशाला अस्थिरतेपासून वाचविण्याचं कारण सांगत शरद पवार भाजपलाही पाठिंबा देऊ शकतात. त्यांच्यासाठी ही संधी 'अभी नही तो कभी नही' अशी आहे.

  • Share this:

मुंबई 30 एप्रिल : लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नरेंद्र मोदींनाही पाठिंबा देऊ शकतात असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे यांनी व्यक्त केलं. पवारांना दोनही पर्याय खुले असून ते NDA किंवा UPAला पाठिंबा देऊन मानाचं पद मिळवतील हे नक्की असंही ते म्हणाले. न्यूज18 लोकमतच्या बेधडक या चर्चेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात राजकीय विश्लेषक भरतकुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेसचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रवक्ते माजीद मेमन यांनी गरज पडली तर शरद पवार पंतप्रधान व्हायला तयार आहेत असं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. आघाडीचं सरकार तयार करण्याची वेळ आली तर शरद पवार मुत्सद्देगिरीच्या बळावर डाव टाकतील असंही ते म्हणाले.

पंतप्रधानपद ही शरद पवारांची सुप्त  इच्छा?

पंतप्रधानपद ही शरद पवारांची सुप्त इच्छा आहे. मात्र त्यांना अनेकदा या संधीने हुलकावणी दिली आहे. पवार हे राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य करण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर देशातल्या बहुतांशी राजकीय पक्षांशी आणि नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे त्यांना ही चांगली संधी असू शकते अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

माजिद मेमन यांचं वक्तव्य हे व्यक्तिगत मत आहे. शरद पवार पंतप्रधान व्हावेत हे राष्ट्रवादीचं अधिकृत मत नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी दिलं. राष्ट्रवादीने ज्या जागा लढवल्या त्यापैकी जिंकून किती येतात हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीकडे तेवढ्या जागा नाहीत त्यामुळे यावरच्या चर्चेत अर्थ नाही. मात्र पंतप्रधान पदाच्या योग्यतेचा नेता राष्ट्रवादीत आहे हे नक्की असंही त्यांनी सांगितलं.

पुन्हा मोदी सरकारच

अशा चर्चा या कायम होतच असतात. निकालानंतर नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असं भाजपने म्हटलं आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, या चर्चा फक्त 23 मे पर्यंतच होतील. त्यानंतर पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील हे निश्चित आहे. शरद पवारांच्या राजकारणाची स्टाईल पाहता हे मेमन यांना शरद पवारांनीच बोलायला सांगितलं असलं पाहिजे असं मतही उपाध्ये यांनी व्यक्त केलं.

शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. मात्र ते इतर पक्षांचं मत असू शकत नाही. राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावं असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटतं असं मत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केलं. प्रत्येक राजकीयपक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेताच पंतप्रधान झाला पाहिजे असं वाटत असतं असंही ते म्हणाले.

'अभी नही तो कभी नही'

ही संधी शरद पवारांसाठी 'अभी नही तो कभी नही' अशी आहे. यावेळी ते पंतप्रधान झाले नाहीत तर त्यांची संधी कायमची हुकणार आहे. पंतप्रधान नाही तर ते किमान उपपंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करतील असं मतही संजय भोकरे यांनी व्यक्त केलं.

पुलोदच्या काळात जनसंघाच्या पाठिंब्यानेच शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पवारांना आपत्ती व्यवस्थापन विभागाचं प्रमुखपद दिलं होतं. 2014मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता अशी आठवण केशव उपाध्ये यांनी करून दिली त्यामुळे आम्ही पाठिंबा देणार नाही हे राष्ट्रवादीच्या मतात फार काही तथ्य नाही असं म्हणत त्यांनीही अप्रत्यक्षपणे पवार भाजपला पाठिंबा देऊ शकतात असेच संकेत दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 06:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading