रमजान काळात पहाटे 5 वाजता मतदान सुरू करणं शक्य? सर्वोच्च न्यायालयाची ECला विचारणा

रमजानच्या काळात पहाटे 5 वाजता मतदान सुरू होईल का? अशी विचारणा आता सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 12:29 PM IST

रमजान काळात पहाटे 5 वाजता मतदान सुरू करणं शक्य? सर्वोच्च न्यायालयाची ECला विचारणा

नवी दिल्ली, 02 मे : रमजानच्या काळात मतदान प्रक्रिया पहाटे 5 वाजता सुरू करणं शक्य आहे का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केली आहे. सर्वोच्च न्यायलयामध्ये याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगला ही विचारणा केली आहे. याबाबत न्यायालयानं निवडणूक आयोगाकडे केवळ विचारणा केली आहे. त्याबाबत उत्तर मागितलं नाही. दरम्यान, याबाबतचा सर्व निर्णय हा निवडणूक आयोगाच्या हातात आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालय करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये केवळ रमजानच नाही तर वाढत्या गर्मीचा देखील विचार व्हावा असं म्हटलं आहे. रमजानच्या काळात 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी एमआयएमकडून देखील रमजानच्या काळात निवडणुका होऊ नयेत असं म्हटलं होतं.


पाकिस्तानी नागरिक महागाईनं बेहाल; जगणं महागलं

काय म्हणाले अबु आझमी

सपाचे आमदार अबु आझमी यांनी रमजानच्या काळात मतदान करणं मुस्लिमांना कठीण आहे. रमजानच्या काळात मतदान कमी होईल. त्याचा फायदा हा भाजपला होणार असल्याचं आझमी यांनी म्हटलं आहे. लखनऊमधील मौलानांनी देखील रमजानच्या काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Loading...

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयच्या विचारण्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय देणार हे पाहावं लागणार आहे. रमजानच्या काळात मुस्लिम बांधव उपवास करत असल्यानं त्याबाबत विचार व्हावं असं देखील काही मुस्लिम संघटना, मौलांना याचं म्हणणं आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर त्याबाबत चर्चा सुरू झाली होती. देशात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे निकाल हे 23 मे रोजी लागणार आहे.


SPECIAL REPORT : मोदींविरोधात लढण्याआधीच माजी सैनिक हरला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...