'डोअर बेल खराब आहे; दरवाजा उघडण्यासाठी मोदी - मोदी ओरडा'

मध्य प्रदेशातील पोस्टर्सची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

मध्य प्रदेशातील पोस्टर्सची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

  • Share this:
    भोपाळ, 11 एप्रिल : देशात सध्या लोकभा निवडणुकीचा माहोल आहे. राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. त्यासाठी अनेक फंडे देखील वापरले जात आहे. देशातील नागरिकांमध्ये देखील निवडणुकीबद्दल उत्सुकता आहे. बाजू घेणं, टीका करणं या गोष्टी देखील सध्या जोरात सुरू आहेत. निवडणुकीच्या या धामधुमीत आता मध्य प्रदेशातील मुरैना येथे लागलेल्या पोस्टरची चर्चा जोरात सुरू आहे. कारण, मुरैना येथे घराबाहेर डोअर बेल खराब आहे; दरवाजा उघडण्यासाठी मोदी - मोदी ओरडा अशी पत्रकं घराबाहेर लावली गेली आहेत. त्याची चर्चा सध्या सर्वत्र जोरात सुरू आहे. प्रिंट करून घराबाहेर अशी पोस्टर्स लावली गेली आहेत. मुरैनामधील राम नगर कॉलनीमधील लोकांचं म्हणणं असं आहे की, कुणीही आम्हाला त्रास देऊ नये म्हणून आम्ही अशी पत्रकं लावली आहेत. कॉलनीतील 100 पेक्षा देखील अधिक घरांवर अशी पत्रकं लावली गेली आहेत. दरम्यान, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता देखील दिसून येत असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. 'बारामतीची चर्चा करायला चालले होते आणि आता...' थोरातांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल 4 टप्प्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये निवडणूक देशातील 91 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. तर, मध्य प्रदेशमध्ये 4 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 29 एप्रिलला 6 जागांसाठी होणार आहे. 6 मे रोजी दुसऱ्या टप्प्यामध्ये सात जागांसाठी मतदान होणार आहे.  8 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे 12 मे रोजी होणार आहे. तर, शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदान हे 18 मे रोजी होणार असून शिल्लक आठ जागांसाठी हे मतदान होणार आहे. दरम्यान, 23 मे रोजी निकाल लागणार असून देशात सत्ता कुणाची हे बाब त्याच दिवशी स्पष्ट होईल. VIDEO : डॉ. बंग दाम्पत्य म्हणाले, 'आम्ही मतदान केलं, तुम्हीसुद्धा करा'
    First published: