News18 Lokmat

VIDEO : नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावात लोकांना घरं मिळालीत का?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वांचा फोकस जयापूरवर आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 09:33 PM IST

VIDEO : नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावात लोकांना घरं मिळालीत का?

जयापूर(वाराणसी) 25 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सत्तेत आल्यानंतर अनेक नव्या योजनांची घोषणा केली. त्यात एक महत्त्वाची घोषणा होती आदर्श ग्राम योजना. या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन ते आदर्श करावं अशी ती योजना होती. या योजने नुसार मोदींनी वाराणसीजवळचं जयापूर हे गाव दत्तक घेतलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वांचा फोकस जयापूरवर आहे. जयापूरबाबात उलटसुलट बातम्या येत असल्याने CNNnews18ने या गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

जयापूरची लोकसंख्या साडेचार हजार आहे. त्यात पटेल, ब्राह्मण, भूमिहार असे सर्वच गट आणि सामाजिक स्तरातले लोक राहतात. या गावात काहीही काम झालं नसून जो दावा केला जातो तो खोटा असल्याची टीका काँग्रेसह अनेक पक्षांनी केलीय. मोदी फक्त घोषणा करतात मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही अशीही टीका करण्यात येते.मात्र जयापूरमध्ये गेल्या चार वर्षात अनेक योजना आणि मोठं काम उभं राहिलं असं दिसून आलंय. गावातल्या दलितांसाठी खास योजनेंतर्गत खास अटलबिहारी वाजपेयी नगर उभारण्यात आलं असून 32 घरं बांधून देण्यात आली आहेत. त्यांना सौर ऊर्जा आणि उज्वला योजनेंतर्गत गॅसही देण्यात आले आहेत.

Loading...

पंतप्रधान आवास योजनेत गावात काही घरंही बांधण्यात आली आहेत. घरातल्या महिलेच्या नावावर ते घर करण्यात आलं असून त्याचा खर्चही देण्यात आला आहे. त्याचा फायदा गावातल्या अनेकांना झाला आहे. तर शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. पण काही ठिकाणी लोकांना अडचणींचाही सामना करावा लागतोय.  अनेक टॉयलेट्स निकृष्ट दर्जाचं असल्याचं आढळून आलं आहे.

चार वर्षांपूर्वी गावात पिण्याच्या पाण्याची चणचण होती. मात्र काही वर्षांपूर्वी गावात नळी आले आहेत. सकाळी आणि संध्याकाळी चार चार तास पाणी येतं अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. अनेक बँकांनी गावात कौशल्य विकास योजनेंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण केंद्रही उभारले आहेत. त्यातून महिलांना रोजगारही मिळलाय. तर शिक्षण घेत असलेल्या मुलींनाही त्यातून रोजगार मिळाला आहे. अजुनही विजेची समस्या असल्याने सौर ऊर्जेचा वापरही सगळीकडे करण्यात येतोय. त्यामुळे गेल्या चार वर्षात गावाची स्थिती पूर्णपणे बदलली असं गावकऱ्यांनी बोलून दाखवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 09:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...