News18 Lokmat

साध्वी प्रज्ञासिंह निवडणूक लढणार की नाही? फैसला निवडणूक आयोगाकडे

साध्वी प्रज्ञासिंह आता निवडणूक लढणार की नाही याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 09:55 AM IST

साध्वी प्रज्ञासिंह निवडणूक लढणार की नाही? फैसला निवडणूक आयोगाकडे

मुंबई, 24 एप्रिल : साध्वी प्रज्ञासिंह विरोधात NIA कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 2008मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये सैय्यद अहमन याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सैय्यदच्या वडिल बिलाल निसार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत मुंबईच्या NIA कोर्टात साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करावी यासाठी याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना NIA कोर्टानं साध्वी यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचं म्हणत याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असा निर्णय दिला आहे. मंगळवारी साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना भाजपनं भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. NIA कोर्टानं निकाल दिल्यानंतर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.


असदुद्दीन ओवैसींचा मोदींना खोचक प्रश्न, '5 वर्ष देश चालवला की पबजी खेळत होतात?


साध्वींची वादग्रस्त विधानं

Loading...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांना मी श्राप दिला होता. त्यानंतर महिनाभरात त्यांचा मृत्यू झाला असं वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंहनं केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. शिवाय, बाबरी मस्जिद प्रकरणात केलेल्या विधानावरून निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवली होती.


'खोटं बोला पण रेटून बोला हा काँग्रेसचा अजेंडा '


अमित शहांनी केली साध्वींची पाठराखण

दरम्यान, सोमवारी बोलवताना शहीद हेमंत करकरेंविरोधात बरळणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंहची भाजप अध्यक्ष अमित शहांनी पाठराखण केली.'साध्वी प्रज्ञासिंह विरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याद्वारे जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आलं. कोर्टात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले', अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी तिची पाठराखण केली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील साध्वींच्या उमेदवारीचं समर्थन केलं होतं.


आधी मुक्ताफळं, मग मौन

वादानंतर मात्र साध्वी प्रज्ञासिंह यांनी मौनव्रत पाळलं आणि एक दिवस आधीच म्हणजेच सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. साध्वींना भाजपने भोपाळमधून दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध रिंगणात उतरवलं आहे. साध्वींनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासोबत भोपाळमधले भाजपचे नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरेपर्यंत साध्वींनी पूर्णपणे मौन पाळलं होतं. आपल्या वक्तव्यांमुळे उमेदवारीच अडचणीत येऊ नये या विचाराने त्यांनी हा निर्णय घेतला असावा.


VIDEO: पार्थ पवार आणि बारणेंच्या लढतीत 'या' अपक्ष उमेदवाराने वेधून घेतलं सर्वांचंच लक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...