• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • दहशतवादाच्या मुद्यावर साध्वी प्रज्ञासिंह यांचा यू टर्न

दहशतवादाच्या मुद्यावर साध्वी प्रज्ञासिंह यांचा यू टर्न

दिग्विजय सिंह यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञासिंह यांनी यू टर्न घेतला आहे.

 • Share this:
  भोपाळ, 26 एप्रिल : शहीद हेमंत करकरे आणि बाबरी मस्जिद संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यांच्या या विधानाची दखल निवडणूक आयोगानं देखील घेतली. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा उल्लेख दहशतवादी म्हणून देखील केला. गुरूवारी सीहोर जिल्ह्यात केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पण, आपल्या या विधानावरून साध्वी प्रज्ञासिंह यांनी आता यू टर्न घेतला आहे. आपण दिग्विजय सिंह यांचा उल्लेख दहशतवादी असा केलाच नसल्याचं साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटलं आहे. संघ कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी मीडियाशी बोलताना आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगानं त्यांना समन्स देखील पाठवलं आहे. साध्वी प्रज्ञासिंह या भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांनी काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांन आव्हान दिलं आहे. हेमंत करकरेंच्या सहकाऱ्याचं आव्हान मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचे सहकारी आणि निवृत्त एसीपी रियाझ देशमुख हे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. रियाझ देशमुख यांनी भोपाळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रियाझ देशमुख यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या पराभवाचा विडा उचलला आहे. 'मैं इन्शा अल्लाह भोपाल लोकसभा सीट के लिए फॉर्म दाखिल करूंगा, सभी दोस्तों से दुआ की दरखास्त', असे आवाहन देशमुख यांनी 21 एप्रिलला फेसबुकच्या माध्यमातून जाहीर केले होते. साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तपास करुन प्रज्ञासिंह यांना तुरुगांत टाकले होते. त्यामुळे ती करकरेंवर जास्त काट खात असल्याचे रियाझ देशमुख यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञासिंहला पराभव करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे देशमुख म्हणाले. साध्वींचं वादग्रस्त विधान 'हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला, असे साध्वी म्हणाल्या होत्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारले, असेही त्यांनी म्हटले होते. साध्वींचं तोंड काळं करा, 5 लाख मिळवा देशासाठी आपले प्राण गमावणारे पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी केली. VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल
  First published: