साध्वी प्रज्ञासिंह यांना कोर्टाचा दिलासा; 'निवडणूक लढवण्यापासून कोणालाही रोखू शकत नाही'

साध्वी प्रज्ञासिंह यांना कोर्टाचा दिलासा; 'निवडणूक लढवण्यापासून कोणालाही रोखू शकत नाही'

साध्वींना एनआय कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 एप्रिल : साध्वी प्रज्ञासिंग यांना निवडणूक लढवण्यासापासून रोखावं याकरता दाखल करण्यात आलेली याचिका NIA न्यायालयानं फेटाळून लावली आहे. 2008मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये सैय्यद अहमन याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सैय्यदचे वडिल बिलाल निसार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत मुंबईच्या NIA कोर्टात साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करावी यासाठी याचिका दाखल केली होती. पण ती याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यावर निर्णय देताना न्यायालयानं न्यायायलय देशातील कोणत्याही नागरिकाला निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही असं म्हटलं आहे. शिवाय, आरोपीला शिक्षा देखील झालेली नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळं आता साध्वी प्रज्ञासिंह यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

साध्वींच्या वकिलांना न्यायालानं झापलं

दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंग या हिंदुत्ववादी विचारधारेकरता निवडणूक लढवत असल्याचं साध्वींच्या वकिलांनी न्यायालयामध्ये सांगितलं. यानंतर न्यायालयानं साध्वी प्रज्ञासिंह यांचे वकिल जे. पी. मिश्रा यांना या खटल्याशी याचा काहीही संबंध नाही. तुम्ही मर्यादेचं उल्लंघन करत आहात. जास्त भावनिक होण्याचं काहीह कारण नाही असं म्हणत वकिलांना झापलं.

हे मजाक आहे का?

यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांची सही याचिकेवर नसल्यानं याचिकाकर्त्यांच्या वकिलांना हे काय मजाक आहे का? असा सवाल केला.

लोकसभेच्या रिंगणात साध्वी

साध्वी प्रज्ञासिंग या भोपाळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांच्याविरोधात त्या उभ्या आहेत. परिणामी या लढतीकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

VIDEO: ...तेव्हा आंबा विकत घेण्याचीही ऐपत नव्हती - पंतप्रधान मोदी

First published: April 24, 2019, 2:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading