साध्वींचं हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान; RSSनं घेतली दखल

साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानाची दखल आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 04:17 PM IST

साध्वींचं हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान; RSSनं घेतली दखल

भोपाळ, 27 एप्रिल : मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल भाजपच्या भोपाळमधील उमेदवारी साध्वी प्रज्ञासिंह यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर भाजपसह साध्वी प्रज्ञासिंहवर जोरदार टीका झाली. लोकसभा निवडणुकांदरम्यान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या विधानावरून भाजप बॅकफूटवर जाताना दिसली. त्यानंतर प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याची दखल आता राष्ट्रीय स्वंयंसेवक संघानं देखील घेतली असून साध्वी यांना संयमानं घ्या असा सल्ला देण्यात आला आहे. एकंदरीत राजकीय वातावरण पाहिल्यानंतर संघाचे नेते देखील चिंतीत झाले. त्यानंतर त्यांनी साध्वी यांना भोपाळमधील संघाच्या कार्यालयामध्ये बोलवत संयमानं घेण्याचा सल्ला दिला.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि विहिंपच्या जवळचे अशी ओळख असलेल्या आणि वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री राहिलेल्या स्वामी चिन्मयानंद यांनी देखील साध्वी प्रज्ञासिंह यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं होतं.


गौतम गंभीरविरोधात FIR दाखल; केली मोठी चूक


Loading...

काय म्हणाल्या प्रज्ञासिंह

‘हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला, असे साध्वी म्हणाल्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारले, असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने हेमंत करकरेंना माझी सुटका करण्याची विनंती केली होती. साध्वी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करावी, असे या पथकाने म्हटलं होते. पण आपल्याकडे साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबदद्ल पुरावे आहेत. त्यामुळेच मी त्यांना या खटल्यातून मुक्त करणार नाही', असे हेमंत करकरे म्हणाले होते, याची आठवण साध्वी यांनी करून दिली. तुरुंगामध्ये आपला अतोनात छळ करण्यात आला, असाही आरोप त्यांनी याआधी केला होता.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील ‘ती खास’ व्यक्ती; यांच्याकडे करायचे ‘मन की बात’


हेमंत करकरेंच्या मित्राचं आव्हान

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचे सहकारी आणि निवृत्त एसीपी रियाझ देशमुख हे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. रियाझ देशमुख यांनी भोपाळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रियाझ देशमुख यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या पराभवाचा विडा उचलला आहे.


VIDEO : 'आगे आगे देखो, होता क्या है' मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...