रॉबर्ट वाड्रांनी ट्विट करताना केली ही मोठी चूक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

रॉबर्ट वाड्रांनी ट्विट करताना केली ही मोठी चूक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

रॉबर्ट वाड्रा यांनी चुकीचं ट्विट डिलीट केल्यानंतर तिरंगा झेंडा हातात असलेला त्यांचा फोटो ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली.

  • Share this:

नवी दिल्ली 12 मे : रॉबर्ट वाड्रा हे कायम कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे सतत चर्चेत असतात. रविवारी लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचं मतदान झालं. रॉबर्ट यांनी दिल्लीत मतदान केल्यानंतरचा सेल्फी ट्विट केला. हे ट्विट करताना त्यांच्याहातून मोठी चूक झाली. त्यांना हे ट्विट चांगलच अंगलट आलं. त्यांनी ट्विटमध्ये भारताचा तिरंगा झेंडा लावण्या ऐवजी पेरुग्वे या देशाचा झेंडा ट्विट केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आणि ते ट्विट डिलीट केलं.

रॉबर्ट वाड्रा यांनी चुकीचं ट्विट डिलीट केल्यानंतर तिरंगा झेंडा हातात असलेला त्यांचा फोटो ट्विट करत दिलगीरी व्यक्त केली. माझ्याकडून चूक झाली. तुम्ही ती चूक लक्षात आणून दिली त्याबद्दल धन्यवाद असं त्यांनी त्या ट्विटमध्ये सांगत देशाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. ही नकळत झालेली चूक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पेरुग्वे हा दक्षिण अमेरिकेतला देश असून त्यांचा झेंडाही तीन रंगांचा आहे. वरती लाल मध्ये पांढरा आणि खाली निळा रंग आणि मध्ये स्टार आहे. तर भारताच्या झेंड्यात वर केशरी, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग आणि मध्ये अशोक चक्र आहे.

साहव्या टप्प्यात असं झालं मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सात राज्यांमधल्या 59 जागांवर रविवारी (12 मे ) मतदान झालं. पश्चिम बंगाल वगळता हे मतदान शांततेत पार पडलं. मात्र मतदानाची सर्वात जास्त टक्केवारीत पश्चिम बंगालने आपला क्रमांक कायम राखला. 6 वाजेपर्यंत मतदानाची एकूण टक्केवारी 59.70 एवढी झाली आहे. या टप्प्यातही सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये झालं. सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंगालमध्ये 80.13 टक्के एवढं मतदान झालं.

या आधीच्या टप्प्यांमध्येही बंगालमध्येच सर्वाधिक मतदान झालं होतं. इतर राज्यांमधलीही मतदानाची टक्केवारी चांगली राहिली. बिहार - 55.04, हरियाणा - 62.14, मध्य प्रदेश - 60.12, उत्तर प्रदेश - 50.82, पश्चिम बंगाल - 80.13, झारखंड - 64.46, दिल्ली - 55.44 या टप्प्यात दिल्लीतल्या सर्व सात जागांवर मतदान पार पाडलं.

एकूण - 59.70 टक्के

बिहार - 55.04

हरियाणा - 62.14

मध्य प्रदेश - 60.12

उत्तर प्रदेश - 50.82

पश्चिम बंगाल - 80.13

झारखंड - 64.46

दिल्ली - 55.44

First published: May 12, 2019, 8:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading