गंगा खरचं स्वच्छ झाली का? साधूंनी अस्सी घाटावरच प्राशन केलं गंगेचं पाणी!

गंगा खरचं स्वच्छ झाली का? साधूंनी अस्सी घाटावरच प्राशन केलं गंगेचं पाणी!

'गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच गंगा नदी एवढी स्वच्छ झाली आहे. दोन वर्षात ती पूर्ण स्वच्छ होईल.'

  • Share this:

वाराणसी 24 एप्रिल : भाजपने 2014 च्या निवडणुकीत गंगा नदी स्वच्छ करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे गेली पाच वर्ष गंगा स्वच्छ झाली का असा प्रश्न त्यांना कायम विचारला जात होता. त्याचं उत्तर आता भाजपकडून देण्यात येत आहे. गंगी 70 टक्के  स्वच्छ झाली असून पुढच्या दोन वर्षात पूर्ण नदीच स्वच्छ होणार असल्याचा दावाही सरकार कडून करण्यात येतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी वाराणसीत रोड शो करणार आहेत आणि शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 'सीएनएन न्यूज18'ने वाराणसीतल्या परिस्थितीचा आढावा घेतला. वाराणसीचा अस्सी घाट हा सगळ्यात प्राचीन आणि महत्त्वाचा समजला जातो. या घाटावर भाजपने काही उपक्रमांचं आयोजन करत जनजागृतीचं काम हाती घेतलंय.

गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच गंगेचं पाणी एवढं स्वच्छ झालं असा दावा इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि साधूंनी केला. एवढच नाही तर त्यांनी घाटावरच गंगेचं पाणी आणून ते पाणी पिऊनही दाखवलं. वारणसीतून गंगेत सोडले जाणाऱ्या नाल्यांच सर्व पाणी आता बंद करण्यात आलं असल्याचा दावाही त्यांनी केलाय.त्यामुळेच यावर्षी झालेल्या कुंभ मेळ्यात लाखो लोकांनी याचा अनुभव घेतला. विदेशी पर्यटकांनीही गंगेत स्नान केलं आणि कौतुक केलं अशी आठवणी त्यांनी सांगितली. निर्मल गंगा योजनेत गंगा नदीच्या काठावर असलेल्या सर्व शहरांमध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यात नदीत सोडलं जाणारं सांडपाणी बंद करण्यात आलं असून ते पाणी स्वच्छ करूनच सोडण्यात येते. त्याचबरोबर नदी किनारी असलेले विविध कारखाण्यांचंही स्थलांतर करण्यात आल्याचं सरकारकडून सांगतलं जाते.

वाराणसीत शक्तिप्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिलला वाराणशीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्या आधी उद्या म्हणजे गुरुवारी 25 एप्रिलला ते भव्य रोड शो करत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. 2014मध्येही त्यांनी असाच रोड शो केला होता. त्यासाठी सुरक्षा दलाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षाव्यवस्थेत ड्रोनचीही मदत घेण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन रोड शो ला सुरुवात करतील. सात किलोमीटरचा त्यांचा हा रोड शो असणार आहे. महत्त्वाच्या भागातून हा रोड शो जाणार असून मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ते गंगा आरतीमध्येही सहभागी होतील. या दौऱ्यासाठी एसपीजीनं अभेद्य असं सुरक्षा कवच निर्माण केलंय.

SPGचं अभेद्य सुरक्षा कवच

10 हजार पोलीस आणि इतर दलांचे कर्मचारी

एक हजार पोलीस साध्या वेशात असणार

SPGचे आयजी वाराणसीत तळ ठोकून

15 आयपीएस अधिकाऱ्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी

घरं, दुकान मालकांची कसून पडताळणी

रोड शोच्या मार्गांवरील घरांवर ड्रोननं नजर

गच्चीवर वीट, दगड ठेवण्यास मनाई

हॉटेल्सकडून पर्यटकांची यादी मागवली

गुप्तचर विभागाचे 150 अधिकारी वाराणसीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 05:59 PM IST

ताज्या बातम्या