'या' खासदाराची संपत्ती 22 हजार, रोजंदारीवर करतात काम!

नव्या लोकसभेत असाही एक खासदार आहे ज्याची संपत्ती केवळ 22 हजार रुपये आहे.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 11:40 AM IST

'या' खासदाराची संपत्ती 22 हजार, रोजंदारीवर करतात काम!

नवी दिल्ली, 29 मे: नव्या लोकसभेतील 542 पैकी 475 खासदार करोडपती आहेत. लोकसभा निवडूण केलेल्या खासदारांची सरासरी संपत्ती 20.93 कोटी इतकी आहे. तर सभागृहातील 266 खासदार असे आहेत ज्यांची संपत्ती 5 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे. 2009च्या लोकसभेत 315 खासदार करोडपती होते. 2014मध्ये ही संख्या 443वर पोहोचली होती. पण नव्या लोकसभेत असाही एक खासदार आहे ज्याची संपत्ती केवळ 22 हजार रुपये आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला तर काँग्रेसला 52 जागांवर समाधान मानावे लागले. संपूर्ण देशाने काँग्रेसला नाकारले. पण केरळमधील काँग्रेसला मोठ यश मिळाले. काँग्रेसच्या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक खासदार केरळमधून आहेत. केरळमध्ये काँग्रेस आघाडीने 19 जागा जिंकल्या त्यापैकी 15 काँग्रेसचे स्वत:चे खासदार आहेत. या 15 खासदारमध्ये एक असलेल्या रम्या हरिदास यांचे नाव सध्या चर्चेत आहेत.

केरळमधून खासदार झालेल्या त्या केवळ दुसऱ्या महिला आहेत. तर यंदाच्या लोकसभेत राज्यातून प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या एकमेव खासदार आहेत. गरिब कुटुंबातून संसदेपर्यंत पोहोचण्याचा रम्या यांचा प्रवास प्रेरणादाई आहे. दैनंदिन रोजगारावर काम करणाऱ्या कर्मचारी असलेल्या 32 वर्षीय रम्या यांची एकूण संपत्ती केवळ 22 हजार इतकी आहे. रम्याची आई एक काँग्रेस कार्यकर्ता आहे. मी गरीबी खुप जवळून पाहिली आहे. एककेळी मी झोपडीत राहत होते. आता सरकारी घरात राहते, असे रम्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

अशी झाली राजकीय सुरूवात

रम्या यांची राजकारणातील सुरूवात 2011मध्ये झाली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टॅलेंन्ट हंटच्या माध्यमातून त्यांची निवड केली होती. लोकसभा निवडणूक लढवण्याआधी रम्या कुन्नमंगलम ग्राम पंचायतीची अध्यक्ष आहे. कुन्नमंगलम हा डाव्यांचा गड मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी अलथुर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. रम्या यांनी माकपचे विद्यमान खासदार पी.के.बीजू यांचा 1 लाख 50 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला.

Loading...

नव्या लोकसभेतील 475 खासदार करोडपती, टॉप थ्री काँग्रेसचे; सेनेचे सर्वजण कोट्यधीश!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने 542 लोकप्रतिनिधींची निवड केली. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR)ने दिलेल्या माहितीनुसार नव्या लोकसभेत 475 खासदार करोडपती आहेत. ADRने 539 खासदारांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारी ही माहिती दिली आहे. ADRनुसार 542पैकी तिघा खासदारांचे प्रतिज्ञापत्र मिळाले नाही. यापैकी दोन खासदार भाजपचे तर एक काँग्रेसचा आहे. 17 व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 303 जागा तर काँग्रेसने 52 जागांवर विजय मिळवला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 543 पैकी 542 मतदारसंघात मतदान घेण्यात आले होते. तर तामिळनाडू येथील वेल्लोर येथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने वेल्लोरमधील निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

भाजपच्या 301 खासदारांपैकी 265 खासदारांच्या प्रतिज्ञापत्राचा ADRने पडताळणी केली. त्यापैकी 265 म्हणजेच 88 टक्के खासदार करोडपती आहेत. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे सर्वच्या सर्व म्हणजे 18 खासदार करोडपती आहेत. काँग्रेसच्या 51 पैकी 43 म्हणजेच 96 टक्के खासदार करोडपती आहेत. याशिवाय डीएमकेचे 23 पैकी 22, तृणमूलचे 22 पैकी 20 आणि वाएसआर काँग्रेसचे 22 पैकी 19 खासदारांची संपत्ती एक कोटीपेक्षा अधिक आहे.

ADRने जाहीर केलेल्या माहितीनुसार सर्वाधिक श्रीमंत खासदारांमध्ये पहिले तिन्ही खासदार काँग्रेसचे आहेत. मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथून विजय मिळवणारे नकुलनाथ हे सर्वाधिक श्रीमंत खासदार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र असलेल्या नकुलनाथ यांची एकूण संपत्ती 660 कोटी इतकी आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला केवळ छिंदवाडा या एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यानंतर तामिळनाडूतील कन्याकुमारी मतदारसंघातील खासदार वसंत कुमार यांचा क्रमांक लागतो. कुमार यांची संपत्ती 417 कोटी इतकी आहे. तर कर्नाटकमधील बेंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के.सुरेश यांची संपत्ती 338 कोटी इतकी आहे.

लोकसभा निवडूण केलेल्या खासदारांची सरासरी संपत्ती 20.93 कोटी इतकी आहे. तर सभागृहातील 266 खासदार असे आहेत ज्यांची संपत्ती 5 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे. 2009च्या लोकसभेत 315 खासदार करोडपती होते. 2014मध्ये ही संख्या 443वर पोहोचली होती.


महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून वृद्ध महिलेला बेदम मारहाण, VIDEO व्हायरलबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 11:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...