प्रादेशिक पक्षच ठरवणार देशाचा नवा पंतप्रधान?

प्रादेशिक पक्षच ठरवणार देशाचा नवा पंतप्रधान?

'बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांची सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका असेल.'

  • Share this:

नवी दिल्ली 18 एप्रिल : 23 मे नंतर देशात येणारं सरकार हे युपीए आणि एनडीए यांचं नसेल तर अन्य पक्षांचं असेल असं भाकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी व्यक्त केलं. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांची खास मुलाखत घेतली. त्यात त्यांनी हे भाकीत व्यक्त केलं त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटणार आहे.

सध्याचं राजकीय वातावरण पाहता लोकसभा निवडणुकीनंतर येणारं नवं सरकार हे प्रादेशिक पक्षांवर अवलंबून असेल असं मत राजकीय तज्ञ आणि विश्लेषकांनी व्यक्त केलं. CNNnews18च्या #Viewpoint with  या कार्यक्रमात बोलतांना हे मत व्यक्त झालं.

देशात सध्या 2014 सारखी परिस्थिती नाही. भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहणार असला तरी इतर पक्षांनाही उत्तम जागा मिळतील त्यामुळे त्या पक्षांनाही मोठ महत्त्व प्राप्त होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.काय म्हणाल्या ममता दीदी

या लोकसभा निवडणुकीत अवघ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालवर लागलं आहे. भाजपला या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. पण आपण एकाही जागेवर हरणार नाही, असं ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे.  पश्चिम बंगालमध्ये भाजप हा त्यांचा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे ही बाब ममतांनी फेटाळून लावली. भाजपला हरवून आम्ही सगळ्या जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपण पश्चिम बंगालमध्ये 23 पेक्षा जास्त जागा जिंकू, असं म्हटलं होतं. त्यावर ममतांनी हे उत्तर दिलं आहे.भाजप स्वप्नं बघतंय'

भाजपने पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 2 जागा मिळवल्या. विधानसभेत भाजपच्या फक्त 3 जागा आहेत. असं असताना भाजपला सगळ्यात मोठा विरोधक कसं काय मानणार, असा सवाल त्यांनी विचारला.

भाजप स्वप्नं बघत असेल तर त्यांचं स्वागत आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. लोकांशी खोटं बोलून भाजप त्यांना फसवत आहे, भाजपकडे कोणतंही व्हिजन नाही, असाही आरोप त्यांनी केला.बंगाल आणि उ. प्रदेश ठरवणार पंतप्रधान

बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांची सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यात भाजपला एक जागा जिंकणंही कठीण होईल, असा दावा त्यांनी केला. पंजाब, दिल्ली या राज्यात भाजप जिंकणं कठीण आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही भाजपची मतं कमी होतील. अशा स्थितीत ते कुठून संख्याबळ आणणार, असं त्यांनी विचारलं.

पश्चिम बंगालमध्ये चांगलं यश मिळालं तर तुम्ही कुणाला पाठिंबा देणार, असं ममतांना विचारलं तेव्हा आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ, असं त्या म्हणाल्या. आमचा पक्ष सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हा निर्णय मी एकटीने घेऊ शकत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 11:19 PM IST

ताज्या बातम्या