सिद्धू यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रविशंकर प्रसाद यांची प्रियांका गांधींवर टीका

सिद्धू यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रविशंकर प्रसाद यांची प्रियांका गांधींवर टीका

सिद्धू यांनी कटिहार येथे केलेल्या विधानावरून आता रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करा. तुम्ही अल्पसंख्य असूनही बहुसंख्य आहात. तुम्ही एकजूट दाखवली तर इथले उमेदवार तारिक अन्वर यांना कुणीही हरवू शकत नाही, असं विधान माजी क्रिकेटर आणि पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं होतं. त्यावरून आता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रियांका गांधी यांना सिद्धू यांचं विधान देशाला कसं काय मजबूत करतं? असा सवाल केला आहे.

जाती –पातीमध्ये विभाजन करणं हे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे. तसेच जेएनयुमध्ये ज्यावेळी देशाचे तुकडे होतील असं बोललं गेलं तेव्हा तिथं कोण गेलं होतं? असा सवाल देखील रविशंकर प्रसाद यांनी केला. राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवण्याच्या मुद्यावरून देखील रविशंकर प्रसाद यांनी प्रियांका गांधी आम्हाला राष्ट्रवाद शिकवत असल्याची टीका  केली.

तीन तलाकवर सवाल

यावेळी रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस तिहेरी तलाकला का विरोध करत आहे? भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईचे पुराव का मागितले जात आहेत? असा सवाल करत देश स्वतंत्र झाला त्यावेळची काँग्रेस आता राहिली नाही.अशी टीका केली.

प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेबांच्या 'सेक्युलॅरिझम'चा खून केला- सुशीलकुमार शिंदे

काय म्हणाले होते सिद्धू

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरुद्ध मतदान करा. तुम्ही अल्पसंख्य असूनही बहुसंख्य आहात. तुम्ही एकजूट दाखवली तर इथले उमेदवार तारिक अन्वर यांना कुणीही हरवू शकत नाही. कटिहारमधल्या बलरामपूर विधानसभा क्षेत्रात बारसोईमध्ये सिद्धू यांनी हे भाषण केलं. तुमची संख्या इथे 64 टक्के आहे. इथले मुस्लीम लोक हे आमची पगडी आहेत. तुम्हाला काही त्रास झाला तरी मला सांगा. मी पंजाबमध्येही तुम्हाला मदत करेन, असं आश्वासन सिद्धू यांनी दिलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता रविशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे.

'मोदींना सीमापार घालवा'

भाजप आणि विरोधकांना लक्ष्य करत सिद्धू म्हणाले, हे लोक मतांची विभागणी करून जिंकू पाहतात पण तुम्ही सगळे एकत्र आलात तर मोदींचा पराभव होईल. या निवडणुकीत षटकार मारा आणि मोदींना सीमेपार घालवा, असंही ते म्हणाले.

SPECIAL REPORT : राज ठाकरेंच्या सभांमुळे भाजपचं गणित बिघडेल का?

First published: April 16, 2019, 8:01 PM IST

ताज्या बातम्या