हा भोजपुरी अभिनेता गोरखपूरमधून लढणार भाजपच्या तिकीटावर

हा भोजपुरी अभिनेता गोरखपूरमधून लढणार भाजपच्या तिकीटावर

रवी किशनच्या भाजप प्रवेशानं आता गोरखपूरच्या उमेदवारीचा प्रश्न मिटला आहे.

  • Share this:

लखनऊ, 15 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता खेळाडू, सेलिब्रेटी राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. शिवाय, लोकसभेच्या रिंगणात उतरत आत्तापर्यंत अभिनेते, खेळाडू यांनी राजकारणात आपलं नशीब देखील आजमावलं आहे. दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता भोजपुरी अभिनेता रवी किशननं देखील भाजपमध्ये प्रवेश केला असून त्याला गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रवी किशननं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. यावेळी रवी किशन सोबत गायक दिनेशलाल यादव देखील होता. यावेळी निवडणुका लढण्याबाबत चर्चा झाली होती.

उमेदवाराच्या शोधात होती भाजप

अखेर रवी किशनला भाजपनं गोरखपूरमधून उमेदवारी दिली आहे. आता भाजपकडून लढणाऱ्या रवि किशननं आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात ही काँग्रेसमधून केली होती. 2014मध्ये रवी किशननं काँग्रेसच्या तिकीटावर जौनपूर येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्याला 42,759 मतं मिळाली होती. त्यानंतर रवी किशननं 2017मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 2019मध्ये रवी किशन भाजपच्या उमेदवारीवर गोरखपूरमधून विजयी होणार का? हे पाहावं लागणार आहे. गोरखपूर ही योगी आदित्यनाथ यांची जागा म्हणून ओळखली जाते. मागील काही दिवसांपासून गोरखपूरच्या जागेवर भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात होतं. अखेर रवी किशनच्या रूपानं भाजपचा शोध संपला आहे.

अखेर आयोगाने केली कारवाई; योगी आणि मायावतींवर प्रचार बंदी

आझम खान यांच्यावर टीका

दरम्यान, रवी किशननं आझम खान यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आझम खान तुमचं लोकसभा निवडणुकीमध्ये डिपॉझीट जप्त होईल असं ट्विट यावेळी रवी किशननं केलं आहे.

VIDEO: खूशखबर! मान्सूनबाबत हवामान विभागानं काय वर्तवला अंदाज?

First published: April 15, 2019, 5:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading