वडिलाचं बोफर्सचं पाप धुण्यासाठी राफेलचा मुद्दा; मोदींची 'न्यूज18'ला खास मुलाखत

वडिलाचं बोफर्सचं पाप धुण्यासाठी राफेलचा मुद्दा; मोदींची 'न्यूज18'ला खास मुलाखत

नरेंदर मोदी राफेल करारावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदर हल्ला चढवला आहे. 'न्यूज18 नेटवर्क'शी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोफर्स प्रकरणामध्ये वडिलांवर लागलेले डाग धुवून टाकण्यासाठी आता राफेलवर प्रश्न विचारत असल्याची टीका केली आहे. 'न्यूज18 नेटवर्क'चे एडीटर इन चीफ राहुल जोशी यांनी नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे.

'राफेलचा वारंवार उल्लेख केला जात आहे. सतत खोटं बोललं जात आहे. विरोधीपक्ष देखील त्यांना सामील झाले आहेत. पण, त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. सर्वोच्च न्यायालयात देखील राफेलचा मुद्दा गेला. पण, त्याठिकाणी देखील काहीच साध्य झालं नाही. कॅगच्या रिपोर्टमधून देखील साऱ्या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. काही पत्रकारांनी तर बोफर्समध्ये पुरावे मिळाले पण, राफेलमध्ये मात्र कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. त्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत काहीही फायदा मिळवून देणार नाही. त्याला सोडून देण्याचा सल्ला दिला'. 'पण, वडिलांवर लागलेले डाग धुण्यासाठी सारे प्रयत्न सुरू असल्याची' टीका नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर देखील लागले होते आरोप

वाजपेयी सरकारच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांना देखील भ्रष्टाचारच्या आरोपात फसवण्याचा प्रयत्न झाला होता. पण, त्यानंतर सारं सत्य बाहेर आले. आता पण त्यांच्याकडून तेच प्रयत्न सुरू आहेत. पण, त्याचा काहीही उपयोग होणार नाही अशी टीका देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी केली.

दरम्यान, विरोधी पक्षातील एका प्रमुख नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा एक देखील आरोप लागला नाही. त्यामुळे काहीही उपयोग होणार नाही. जनता समजूतदार असल्याचं या नेत्यानं म्हटल्याचं देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

'भ्रष्टनाथ' काहीही म्हणाले तरी भ्रष्टाचारावर कारवाई आवश्यक - PM मोदी

मी चौकीदार

2013 -14मध्ये देखील मी चौकीदार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मी देशाच्या तिजोरीवर कुणालाही डल्ला मारू दिला नाही. आज देखील मी चौकीदार आहे. यापुढे देखील देशाची तिजोरी सुरक्षित असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

VIDEO: प्रियांकांच्या रॅलीत 'मोदी.. मोदी..'च्या घोषणा; कार्यकर्ते आपसात भिडले

First published: April 9, 2019, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading