राहुल गांधी घेणार का पराभवाची जबाबदारी? राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

राहुल गांधी घेणार का पराभवाची जबाबदारी? राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकारल्यास अध्यक्षपदाची जबाबदारी कोण सांभाळणार?

  • Share this:

नवी दिल्ली, प्रशांत लीला रामदास 24 मे : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. अनेक दिग्गज नेत्यांची हार आणि पंजाब वगळता काँग्रेसला उर्वरित राज्यांमध्ये अस्तित्वासाठी देखील झगडावं लागलं. अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पहिलीच निवडणूक लढवली होती. शिवाय, त्यांना बहिण प्रियांका गांधी यांची देखील साथ मिळाली होती. पण, त्यानंतर देखील काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी ( उद्या ) होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी आपला राजीनामा देण्याची शक्यता आहे.


भाजपमध्ये अडगळीत पडलेले अडवाणी, जोशी ट्रेंडिंगमध्ये!

2014मध्ये देखील चालली नव्हती जादू

2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवली होती. तेव्हा देखील काँग्रेसने केवळ 44 जागांवर विजय मिळवला होता. आता मोदी सरकारच्या विरोधात जोरदार प्रचार केल्यानंतर देखील काँग्रेसला फार काही हाती लागले नाही. पण, यापूर्वी तिन राज्यांमध्ये काँग्रेसनं राहुल गांधी यांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर काँग्रेसला अच्छे दिन आल्याची चर्चा रंगली होती. पण, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मात्र यश मिळालं नाही.


‘मुंबईतून प्रवास सुरू केल्यास काँग्रेसचा पहिला खासदार पंजाबमध्ये भेटेल’

राज्यात देखील काँग्रेसला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसला मोठा धक्का बसला. नांदेडमधून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पराभूत झाले. राहुल गांधी लोकसभा प्रचाराचा नारळ हा महाराष्ट्रातून फोडला होता. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा देखील कमी जागा या काँग्रेसला मिळाल्या. त्यामुळे देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या पराभवावर आता पक्षांतर्गत देखील चर्चा सुरू झाली आहे.


VIDEO: धर्मात तेढ निर्माण करणारे यशस्वी झाले- सुशीलकुमार शिंदे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 02:35 PM IST

ताज्या बातम्या