VIDEO : राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याची पात्रता नाही - अनुपम खेर

VIDEO : राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याची पात्रता नाही - अनुपम खेर

गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून राहुल गांधी हे राजकारणात आहेत. मात्र एक मजबूत नेता म्हणून ते आपला प्रभाव दाखवू शकले नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 15 मे : प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियामध्येही त्यांच्या वक्तव्यांची कायम चर्चा होत असते. बुधवारी त्यांनी 'न्यूज18 इंडिया'च्या 'आर पार' कार्यक्रमात अनेक प्रश्नांना बेधडक उत्तरं दिली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे व्यक्ती म्हणून चांगले असले तरी देशाचा पंतप्रधान होण्याची पात्रता आणि क्षमता त्यांच्यामध्ये नाही असं परखड मतही त्यांनी या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केलं.

अनुपम खेर म्हणाले, गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून राहुल गांधी हे राजकारणात आहेत. मात्र एक मजबूत नेता म्हणून ते आपला प्रभाव दाखवू शकले नाही. काँग्रेसमध्ये अनेक बुद्धिमान नेते आहेत त्यांनी पुढे यावं, मात्र घराणेशाहीमुळे गांधी घराण्याशीवाय काँग्रेसमध्ये कुणीही पुढे येऊ शकत नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

राहुल हे माणूस म्हणून चांगले आहेत. त्यांचा आदरही आहे पण देशाचं नेतृत्व करण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मात्र मी त्यांना पसंती देऊ शकत नाही. विचारांची स्पष्टता, नेतृत्व करण्याची क्षमता, संघटन कौशल्य या सगळ्याच गोष्टींची त्यांच्यामध्ये कमतरता दिसते असंही ते म्हणाले. हे गुण दाखविल्याशीवाय देशातली जनता त्यांना स्वीकारणार नाही.

तुम्हा मोदी भक्त आहात का? या प्रश्नावरही त्यांनी सडेतोड मत व्यक्त केलं. ते म्हणाले एखाद्या नेता जर आवडतो, तो उत्तम काम करत असेल तर त्याचं भक्त म्हणून घेण्यात काय वाईट आहे. कुणी फक्त डिवचण्यासाठी असं म्हणत असेल तर होय मी भक्त आहे असंच मी म्हणणार. मी दिलीप कुमार, सुनील गावस्कर यांचाही भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.

2014 च्या आधीपासूनच बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत असं त्यांनी सांगितलं. जी माणसं व्यक्तिस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याबद्दल बोलतात ती माणसं सर्वात जास्त असहिष्णू आहेत असा टोलाही त्यांनी हाणला. या लोकांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना जागं करता येणं शक्य नाही असंही ते म्हणाले.

मनमोहन सिंग हे सज्जन आणि प्रामाणिक गृहस्थ असले तरी त्यांच्या प्रामाणिकपणाची किंमत देशाने का द्यावी असा सवालही त्यांनी केला. ते पंतप्रधान असताना रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात होता हे सर्व जगाने पाहिलं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

23 मे नंतर निकाल लागतील आणि नरेंद्र मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील मोदी हेच पंतप्रधान व्हावेत असं देशातल्या जनतेला वाटतं असंही त्यांनी सांगितंलं.

First published: May 15, 2019, 8:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading