'राहुल गांधी 'पप्पू' नाहीत तर...'

'राहुल गांधी 'पप्पू' नाहीत तर...'

'राहुल हे ते अतिशय बुद्धिमान आहेत. आधुनिक विचारांचे आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व आलं तर ते अतिशय चांगलं काम करू शकतील.'

  • Share this:

इंदूर 05 मे : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून आणि सोशल मीडियातून कायम 'पप्पू' अशी टीका केली जाते. संसदेतल्या आपल्या भाषणात खुद्द राहुल गांधी यांनीही त्याचा उल्लेख केला होता. राहुल यांच्या मदतीला आता सॅम पित्रोदा धावून आले आहेत. राहुल हे पप्पू नाहीत तर उच्च शिक्षित आहेत असं मत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलंय. त्यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज आहे असंही ते म्हणाले.

भारताच्या टेलिकॉम क्रांतीचे जनक असलेले सॅम पित्रोदा यांना राहुल गांधी यांचे गुरू समजले जाते. इंदूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पित्रोदा म्हणाले, भाजपकडून गेल्या 10 वर्षात राहुल गांधी यांची पप्पू अशी प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. पण राहुल हे अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि अशा तरुणांची देशाचा गरज आहे.

राहुल बुद्धीमान नेते आहेत

ते पुढं म्हणाले, राहुल गांधी यांच्यासोबत मी बराच काळ घालवला आहे. ते अतिशय बुद्धिमान आहेत. आधुनिक विचारांचे आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व आलं तर ते अतिशय चांगलं काम करू शकतील. देशाला खोटी आश्वासनं देणाऱ्या लोकांची नाही तर आधुनिक विचारसरणी असणाऱ्या नेत्यांची गरज आहे.

ते म्हणाले, राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी  यांच्यासोबत अतिशय जवळून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी देशाला पुढे नेण्याचं काम केलं. ते काम पुढे नेण्याचं सर्व गुण राहुल यांच्याकडे आहेत. देशात लोकशाहीचं संवर्धन झालं पाहिजे असा नेता पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

असा कसा गुजराती माणूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींवर केलेल्या टीकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मीही गुजराती आहे, गुजरातमधून आलोय. एक गुजराती माणूस असलेला पंतप्रधान अशा पद्धतीने बोलते याची मला लाज वाटते अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेवरून सध्या राजकीय वादळ निर्माण झालं. मोदी यांच्यावर काँग्रेसने जोरदार टीका केलीय. मोदी यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या नेत्याचा अपमान केला असा आरोप राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केला आहे.

VIDEO अक्षरमंत्र भाग 16 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - श, ष, स, ह

First published: May 5, 2019, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading