News18 Lokmat

मोदींची राजीव गांधींवर टीका; राहुल म्हणाले, 'तुम्हाला माझं खूप सारं प्रेम आणि मिठी'

'तुमची तुमच्या स्वत:बद्दल असलेली मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुम्ही वाचू शकणार नाही. माझ्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम आणि मिठी'

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 04:48 PM IST

मोदींची राजीव गांधींवर टीका; राहुल म्हणाले, 'तुम्हाला माझं खूप सारं प्रेम आणि मिठी'

नवी दिल्ली, 5 मे : "तुमच्या वडिलांच्या पाठिराख्यांनी त्यांची 'मिस्टर क्लिन' अशी प्रतिमा तयार केली. पण 'भ्रष्टाचारी नंबर 1' अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी मोदींवर पलटवार केला आहे.

'मोदीजी, लढाई आता संपली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्या स्वत:बद्दल असलेली मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुम्ही वाचू शकणार नाही. माझ्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम आणि मिठी,' असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी राहुल यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आक्रमक टीका केली असताना राहुल यांनी मात्र प्रेम आणि मिठी याने उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी परस्परांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. चौकीदार चोर है अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना दिसत आहेत. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांनी देखील राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Loading...

तुमचे वडील राजीव गांधी मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जात होते. पण, मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शनिवारी उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे नरेंद्र मोदी बोलत होते. राफेल कराराच्या मुद्यावरून राहुल गांधी चौकीदार चोर है अशा शब्दात नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. त्यानंतर मोदींनी राहुल गांधींना हे उत्तर दिलं आहे.


SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2019 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...