नवी दिल्ली 02 मे : निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप हे ठरलेलेच असतात. त्यामुळे प्रचारात रंगतही येते. निवडणुकीचा प्रचार जसा रंगत जातो तशी प्रचारालाही धार येते. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि भाजपचे खासदार परेश रावल यांच्यातलं ट्विटर युद्ध सध्या सोशल मीडियावर चांगलंच रंगलं आहे. राबडी देवींनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला परेश रावल यांनी उत्तर दिल्यानंतर शब्दांचं हे युद्ध आणखी भडकलं.
सोशल मीडियाच्या प्रभावानंतर नेत्यांना प्रचाराचं नवं व्यासपीठ मिळालं. अगदी कमी वेळा जास्तित जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून जाता येते. हीच या माध्यमाची ताकदही आहे. राबडी देवी यांनी त्याचाच वापर करत पंतप्रधानांवर निशाणा साधला. तर परेश रावल यांनीही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं.
5 साल एक्टिंग बहुत हो गयी अब मुद्दे की बतियाई। तुम रील ही नहीं रीयल लाइफ़ में भी जोकर हो। चारा तो कहीं भी, कैसे भी..यानि खड़े होकर, बैठकर या चलते-फिरते भी खाया जा सकता लेकिन तुम्हारे गुजराती चाचा राफ़ेल को कब, कैसे, कहाँ और क्यों चबा गए? लोहा वो भी बम समेत चबा गए। गज़ब गुजराती है https://t.co/OfkkvVTYhP
— Rabri Devi (@RabriDeviRJD) May 2, 2019
लिची कशी खातात माहित आहे का?
अभिनेता अक्षयकुमारने घेतलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींना आंबा खाण्यावर प्रश्न विचारला होता. त्यावरून राबडी देवी यांनी मोदींवर टीका केली. राबडी देवी म्हणाल्या, पंतप्रधान काल मुजफ्फरपूर या लिचीच्या शहरात आले होते. तिथे लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की लिची खातात कशी, पण त्याचं उत्तर त्यांना देतात आलं नाही. कारण हा प्रश्न कुणा अभिनेत्यानं त्यांना विचारला नव्हता आणि तो प्रश्न पूर्वनियोजितही नव्हता.
या टीकेवर परेश रावल यांनी उत्तर दिलं की, पर चारा तो कही भी कैसे भी खा सकते है. यावर राबडी देवी भडकल्या, त्यांनी पुन्हा ट्विट करून परेश रावल यांना उत्तर दिलं. चारा कसाही खाता येतो हे खरं असलं तरी तुमच्या गुजराती काकाने लोखंडाचं राफेल विमान कसं, केव्हा, आणि कुठे खाल्लं हे कुणालाही कळालं नाही. ते अजब गुजराती काका आहेत.
दोन नेत्यांच्या या ट्विटर युद्धात नेटकऱ्यांनाही आपली हौस भागवून घेतली. काही लोकांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका करत चारा घोटाळ्याची आठवण काढली तर काहींनी राफेलच्या भ्रष्टाचारावरून मोदींना टार्गेट केलं.