प्रियंका गांधी म्हणाल्या, पंजाबचे लोक स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी होते. स्वातंत्र चळवळीत काँग्रेसच्या लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. महात्मा गांधीजींच्या मागे सर्व देश उभा राहिला. त्यावेळी संघाचे लोक मात्र ब्रिटिशांची चमचेगीरी करत होते असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या आधी राहुल गांधी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही टीका केली होती. स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती असा आरोपही त्यांनी केला होता. काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी 1984च्या दंगलीवर प्रतिक्रिया देताना जे झालं ते झालं, त्याचं आता काय? असं वक्तव्य केलं होतं. त्यावर देशभर वादळ निर्माण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केल्याने पित्रोदांना माफीही मागावी लागली होती. त्याला छेद देण्यासाठी आता काँग्रेसकडून स्वातंत्र्य चळवळीतल्या संघाच्या योगदानाचा मुद्दा उपस्थित करण्यात येत असल्याचं मतही व्यक्त होतंय.Priyanka Gandhi Vadra in Bathinda, Punjab: When the entire Punjab was fighting for country's independence, RSS people were doing 'chamchagiri' (flattery) of Britishers, they never fought in the independence movement. pic.twitter.com/ObeOD0R549
— ANI (@ANI) May 14, 2019
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.