कोलकाता 16 मे : कोलकत्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचं राजकारण अजुन शांत झालेलं नाही. यावेळी थोर विचारवंत ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती फोडण्यात आली होती. ही मूर्ती तृणमूलच्या गुंडांनी फोडली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यावर मोदींना थेट जेलमध्ये टाकण्याची धमकी दिलीय.
कोलकत्यातल्या एका महाविद्यालयात असलेली ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती मंगळवारच्या हिंसाचारात फोडलेली आढळली होती. त्यावरून भाजप आणि तृणमूलमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ही मूर्ती तृणमूलच्या गुंडांनी फोडली असा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. तर ही मूर्ती भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फोडली असा दावा ममता बॅनर्जी यांनी केलाय.
Modi promises grand Vidyasagar statue, as battle with TMC intensifies
— ANI Digital (@ani_digital) May 16, 2019
Read @ANI story | https://t.co/rBrADgupHG pic.twitter.com/vWxcHCbDgv
ममता म्हणाल्या, बंगालची जनताच आता विद्यासागर यांची मूर्ती बनवून देईल. हिंसाचारात ज्या महाविद्यालयाचं नुकसान झालं ते 200 वर्ष जुनं होतं. त्याची भरपाई भाजप करून देणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. ही मूर्ती तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी फोडली असेल तर ते आरोप सिद्ध करा नाही तर तुम्हाला आम्ही जेलमध्ये घेऊन गेल्याशीवाय राहणार नाही असा इशाराच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दिला.
WB CM:He (PM) said he'll make Vidyasagar statue.Bengal has money to make the statue.Can he give back the 200 years old heritage? We've proof&you say that TMC has done.Aren't you ashamed?He should do sit ups for lying so much.Liar.Prove allegations otherwise we'll drag you to jail pic.twitter.com/v9zKD2xIjW
— ANI (@ANI) May 16, 2019
तर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात विरोधात जी भाषा वापरली त्याच्या विरोधात भाजपने आज मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध अशी भाषा वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जावी अशी मागणी केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
तर मी जी भाषा वापरली ती योग्यच होती. त्याबद्दल मला खेद नाही मी जेलमध्ये जायला तयार आहे अशी प्रतिक्रीया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलीय.