News18 Lokmat

या कारणास्तव राहुल गांधींना पाटणाला न जाता दिल्लीला परतावं लागलं

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानामध्ये बिघाड झाल्यानं त्यांना दिल्लीला परतावं लागलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 12:23 PM IST

या कारणास्तव राहुल गांधींना पाटणाला न जाता दिल्लीला परतावं लागलं

नवी दिल्ली, 26 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता सध्या जोरात प्रचार सुरू आहे. पण, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मात्र विमानात बिघाड झाल्यानं आपला पाटणा दौरा अर्धवट सोडून पुन्हा दिल्लीला परतावं लागलं. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. पाटनाला जात असताना आमच्या विमानात बिघाड झाला. त्यामुळे आम्ही दिल्लीला परतलो. त्यामुळे बिहारमधील समस्तीपूर, ओडिसातील बालासोर आणि महाराष्ट्रातील संगमनेरमधील सभांना उशीर होणार आहे. त्यामुळे खेद वाटत असल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी राहुल गांधी यांनी व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर केला आहे. राहुल गांधी सध्या प्रचारामध्ये व्यस्त असून त्यांनी अमेठी आणि वायनाड या ठिकाणाहून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.Loading...


यापूर्वी देखील झाला होता विमानामध्ये बिघाड

दरम्यान, यापूर्वी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारादरम्यान देखील राहुल गांधी यांच्या विमानामध्ये बिघाड झाला होता. काँग्रेसनं याबाबत तक्रार देखील दाखल केली होती. त्यावेळी तिसऱ्या प्रयत्नामध्ये राहुल गांधी यांची विमान हे हुबळी विमानतळावर उतरवलं गेलं होतं.


VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 12:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...