VIDEO 'वाराणसीत पराभवाच्या भीतीनेच प्रियंका गांधींचं नाव घोषीत करण्याला उशीर'

VIDEO 'वाराणसीत पराभवाच्या भीतीनेच प्रियंका गांधींचं नाव घोषीत करण्याला उशीर'

2004 चा अपवाद वगळला तर 1991 पासून काँग्रेसला वाराणसीत कधीच विजय मिळाला नाही.

  • Share this:

वाराणसी 24 एप्रिल : प्रियंका गांधी यांना वाराणसीत काँग्रेसची उमेदवारी मिळू शकते अशी जोरदार चर्चा आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही तसे संकेत दिले आहेत. मात्र काँग्रेसने त्यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही. काँग्रेसला प्रियंका गांधी यांच्या पराभवाची भीती वाटत असल्यानेच त्यांच्या नावाची घोषण होत नाही अशी टीका भाजपने केली आहे. न्यूज18 इंडियाचा हम तो पुछेंगे हा कार्यक्रम आज थेट वाराणसीत घेण्यात आला. त्यावेळी लोकांनी सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींना त्यांचा गेल्या पाच वर्षातला हिशेब मागितला.2004 चा अपवाद वगळला तर 1991 पासून काँग्रेसला  वाराणसीत जागेवर कधीच विजय मिळाला नाही. 2014 मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 70 हजाराच्या आसपास मतं मिळाली असं असताना काँग्रेस इथं प्रियंका गांधींना उमेदवारी देण्याची  हिंम्मत कशी दाखवू शकते असा सवाल भाजपने केला आहे.तर काँग्रेसचं वाराणसीत गेली अनेक दशकं काम असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. मोदी यांनी अनेक आश्वासन दिलं होती. मात्र ती पूर्ण केली गेली नाहीत. गंगा नदी स्वच्छ करू असं आश्वासन  भाजपने दिलं होतं. मोदींनी गंगेच्या काठावरून मोठ मोठ्या घोषणा केल्या मात्र त्या पूर्ण केल्या नाही असा आरोप काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने केलाय.

गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच गंगेचं पाणी एवढं स्वच्छ झालं असा दावा इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि साधुंनी केला. एवढच नाही तर त्यांनी घाटावरच गंगेचं पाणी आणून ते पाणी पिऊनही दाखवलं. वारणसीतून गंगेत सोडले जाणाऱ्या नाल्यांच सर्व पाणी आता बंद करण्यात आलं असल्याचा दावाही त्यांनी केलाय.त्यामुळेच यावर्षी झालेल्या कुंभ मेळ्यात लाखो लोकांनी याचा अनुभव घेतला. विदेशी पर्यटकांनीही गंगेत स्नान केलं आणि कौतुक केलं अशी आठवणी त्यांनी सांगितली. निर्मल गंगा योजनेत गंगा नदीच्या काठावर असलेल्या सर्व शहरांमध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यात नदीत सोडलं जाणारं सांडपाणी बंद करण्यात आलं असून ते पाणी स्वच्छ करूनच सोडण्यात येते. त्याचबरोबर नदी किनारी असलेले विविध कारखाण्यांचंही स्थलांतर करण्यात आल्याचं सरकारकडून सांगतलं जाते.मोदींची मुलाखत आणि राजकारण

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी मुलाखत घेतली. सर्व माध्यमांमध्ये त्याची जोरदार चर्चाही झाली. ही मुलाखत पूर्णपणे गैर राजकीय असली तरी सोशल मीडियावर त्यावर चांगलीच टीकाही झाली. मोदी हे उत्तम अभिनेते आहेत. आता त्यांनी 23 तारखेनंतर राजकारण सोडून अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करावा अशी टीका ही करण्यात येतेय.  राहुल गांधी यांनी एक ट्विट करून मोदी हे 'मक्कार' आहेत अशी टीका केलीय.नरेंद्र मोदी यांच्या अराजकीय मुलाखतीवर वाद होत असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट करुन मोदींवर टीका केलीय. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,

हकीकत रूबरू हो तो अदाकारी नहीं चलती।

जनता के सामने, चौकीदार मक्कारी नहीं चलती।

या ट्विटनंतर वातावरण अधिकच तापलं आहे. या मुलाखतीमुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा तिळपापड झाला असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी केलीय. अक्षय कुमारने मुलाखत घेऊन काय चूक केली का असा सवालही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 10:24 PM IST

ताज्या बातम्या