नवी दिल्ली, 17 मे : केंद्रीय मंत्री आणि अमेठीतील भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींवर हल्लाबोल केला आहे. मतांसाठी प्रियांका गांधी काहीही करू शकतात. मतांसाठी प्रियांका गांधी या पहिल्यांदा अमेठीमध्ये नमाज पठण करतात. त्यानंतर त्या उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरामध्ये जात दर्शन घेतात. यावरून काँग्रेस किती घाबरली आहे हे दिसून येत असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीसांना मतांसाठी हे सर्व करावं लागत असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली आहे.
'काँग्रेसनं धोका दिला'
काँग्रेसनं शेतकरी आणि बेरोजगारांना धोका दिल्याची टीका यावेळी स्मृती इराणी यांनी केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर बोलावं, असा सवाल देखील यावेळी स्मृती इराणी यांनी केला. भाजप सरकारनं गरिबांसाठी चालवलेल्या योजना काँग्रेसनं बंद केल्याचा आरोप यावेळी स्मृती इराणी यांनी केला. खंडवा लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी स्मृती इराणी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. आचारसंहितेचं कारण सांगत मध्य प्रदेश सरकारनं शेतकरी कर्ज माफी आणि बेरोजगार भत्ता रोखून धरल्याचा आरोप देखील स्मृती इराणी यांनी केला.
आठवलेंनी का दिला मायावतींना लग्न करण्याचा सल्ला?
प्रियांका गांधीवर टीकास्त्र
यापूर्वी देखील स्मृती इराणी यांनी प्रियांका गांधींवर वेळोवेळी हल्ला केलेला आहे. लहान मुलं पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलत होते. त्यावेळी प्रियांका गांधी देखील त्या ठिकाणी हजर असल्याचा व्हिडीओ स्मृती इराणी यांनी ट्विट केला होता. दरम्यान, स्मृती इराणी यांनी दाखवलेला व्हिडीओ अर्धवट असल्याचं प्रत्युत्तर प्रियांका गांधी यांनी दिलं होतं.
VIDEO: 'साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या तर डायन'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 2019 Lok Sabha election, Amethi S24p37, BJP, Congress, Priyanka gandhi, Uttar Pradesh Lok Sabha Elections 2019