VIDEO 'काँग्रेसचं 'ब्रम्हास्त्र' उत्तर प्रदेशात फेल ठरणार'

VIDEO 'काँग्रेसचं 'ब्रम्हास्त्र' उत्तर प्रदेशात फेल ठरणार'

'आमच्या दुष्टीने काँग्रेस आणि भाजप एकच आहे. काँग्रेसचीच सर्व धोरणं भाजप पुढे राबवीत आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 02 मे : प्रियंका गांधी यांचा जेव्हा राजकारणात प्रवेश झाला तेव्हा त्यांचं वर्णन 'ब्रम्हास्त्र' असं करण्यात आलं होतं. मात्र गेल्या काही महिन्यात हे 'ब्रम्हास्त्र' सपशेल फेल ठरत आहे. 23 मे नंतर याचं खरं रुप लोकांसमोर उघड होईल अशी टीका भाजपने केली आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशात कमकुवत उमेदवार उभे केले असं वक्तव्य प्रियंका गांधी यांनी केलं होतं त्यावरून आता राजकारण सुरू झालंय. निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जिथे काँग्रेस जिंकण्याची शक्यता नाही तिथे आम्ही कमकुवत उमेदवार दिले ते भाजपची मतं खातील असं वक्तव्य प्रियंका गांधी यांनी बुधवारी केलं होतं. त्यावरून वाद झाल्याने त्यांना आज स्पष्टिकरण द्यावं लागलं. काँग्रेसने कमकूवत नाही तर मजबूत उमेदवार दिले असं स्पष्टिकरण त्यांनी आज दिलं. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

काँग्रेस भाजप सारखेच

प्रियंका गांधी यांच्या वक्तव्याचे आता अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. समाजवादी पक्ष आणि बसपाच्या आघाडीला फायदा पोहोचविण्यासाठी काँग्रेस असा डाव खेळत असावा असं मत CSDSचे संचालक संजय कुमार यांनी व्यक्त केलं. उद्या सपा-बसपा आघाडी जिंकली तर आम्हीच फायदा मिळवून दिला असं काँग्रेस म्हणू शकते असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

तर आमच्या दुष्टीने काँग्रेस आणि भाजप एकच आहे असं समाजवादी पक्षाने म्हटलं आहे. सपा-बसपा मजबूत असून आम्ही आमच्या सामर्थ्यावर निवडणूक लढवत आहोत असंही ते म्हणाले.

...तर मरण पत्करेन

उत्तर प्रदेशात काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिले नाहीत. भाजपला फायदा होण्याचा प्रश्नच नाही. असा फायदा पोहोचविण्याआधी मी मरण पत्करेल अशी भूमिका काँग्रसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज स्पष्ट केली. जिथे काँग्रेस जिंकण्याची शक्यता नाही तिथे आम्ही कमकुवत उमेदवार दिले असं प्रियंका गांधी यांनी म्हटल्याचं वृत्त आल्यानंतर काँग्रेसवर टीका होत होती. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

भाजपलाच नुकसान

प्रियंका गांधी म्हणाल्या, काँग्रेसने सर्व उमेदवार हे सक्षम दिले आहे. आमचा कुठलाही दुसऱ्या हेतू नाही. भाजपला फायदा होईल असं आम्ही काहीही करणार नाही. उलट आमचे उमेदवार भाजपची मतं खातील. हे आम्ही खूप विचारपूर्वक केलं आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.

ही जीवन मरणाची लढाई आहे. विचारधारेची लढाई आहे. ही लढाई आम्ही सर्वस्व पणाला लावून लढतोय. त्यासाठीच मी राजकारणात आली आहे. प्रियंका गांधी यांच्या बुधवारच्या वक्तव्यानंतर असं बोललं जात होतं की काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिल्यामुळे भाजपला फायदा होणार आहे तर बसपा-सपा आघाडीला नुकसान होणार आहे.

First published: May 2, 2019, 10:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading