राहुल गांधी उमेदवारासाठी झाले व्हिडिओग्राफर; कुमार गंधर्वांच्या गावातील 'त्या व्यक्ती'ची देशभर चर्चा

कुमार गंधर्वांच्या देवासमधून पद्मश्री प्रल्हाद टिपणिया लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 13, 2019 03:49 PM IST

राहुल गांधी उमेदवारासाठी झाले व्हिडिओग्राफर;  कुमार गंधर्वांच्या गावातील 'त्या व्यक्ती'ची देशभर चर्चा

देवास, 13 मे : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं दिलेल्या उमेदवारांमध्ये 6 उमेदवारांचा चेहरा नवीन आहे. पण, या उमेदवारांमध्ये चर्चा सुरू झाली हे ती टिपणिया यांच्याबद्दल. प्रल्हाद टिपानिया हे कुमार गंधर्वांच्या देवास – शाजापूरमधून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. प्रल्हाद टिपणिया हे आंतरराष्ट्रीय कबीर भजन गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. टिपानिया हे मुळचे उज्जैन जिल्ह्यातील लुनियाखेडी गावातील आहे. पण, आता काँग्रेसनं दिलेल्या उमेदवारीनंतर प्रल्हाद टिपणिया राजकीय क्षितीजावर चर्चेत आले आहेत.

विज्ञानाचे शिक्षक ते काँग्रेसचे उमेदवार

उज्जैन जिल्ह्यातील लुनियाखेडी हे प्रल्हाद टिपणिया यांचं मुळ गाव. प्रल्हाद टिपणिया विज्ञानाचे शिक्षक देखील होते. आपल्या गावातूनच त्यांनी संत कबीरांची भजनं गायला सुरूवात केली. परदेशात देखील त्यांच्या भजनाचे कार्यक्रम होतात. याच भजनाच्या जोरावर सातासमुद्रापार असलेली लोकं देखील त्यांचे शिष्य झाले. हॉवर्ड विद्यापाठातील प्रोफेसर भारतात आल्या आणि टिपणिया यांचे शिष्य झाल्या. यावर त्या प्रोफेसर थांबल्या नाहीत तर त्यांनी आपलं नाव अंबा सारा ठेवलं. अंबा सारा प्रल्हाद टिपणिया यांच्या भजनांचा इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचं काम करतात.


पद्मश्रीनं सन्मानित

Loading...

प्रल्हाद टिपणिया यांना 2011मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राजकारण आणि त्यांच्या जवळचा संबंध नाही. पण, त्यांचे वडील हे काँग्रेसच्या जवळ होते. टिपणिया यांच्या भावानं काँग्रेसमध्ये जबाबदारी सांभाळली असून मुलगा विजय काँग्रेस आयटी सेलचा ब्लॉक अध्यक्ष राहिला आहे.


बलई समाज आणि रल्हाद टिपणिया

प्रल्हाद टिपणिया हे बलई समाजातून आहेत. समाजाचा लोकप्रिय चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. देवास – शाजापूरमध्ये 3.50 लाख मतदार हे बलई समाजातील आहेत. 2014मध्ये काँग्रेसला या ठिकाणी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना 40 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं.

देवास – शाजापूरचा मागील 30 वर्षाचा इतिहास पाहता काँग्रेसचे सज्जनसिंह वर्मा केवळ 2009मध्ये विजयी झाले आहेत. तर, 2014मध्ये त्यांना अडीच लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.


VIDEO: नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, विश्वास नांगरे पाटील स्वत: मैदानात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2019 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...