प्रज्ञासिंहांना 'साध्वी' हे नाव लावण्याचा अधिकार नाही - काँग्रेस

प्रज्ञासिंहांना 'साध्वी' हे नाव लावण्याचा अधिकार नाही - काँग्रेस

'शहीदांचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा भाजपने निषेध करुन माफी मागितली पाहिजे.'

  • Share this:

नवी दिल्ली 19 एप्रिल : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद अधिकाऱ्यांबद्दल केलेलं वक्तव्य हे अतिशय संतापजनक असून विष पसरविणारं आहे. असं विषारी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला आपल्या नावापुढे साध्वी हा शब्द लावण्याचा अधिकार नाही असं मत काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेडा यांनी व्यक्त केलं. हा शहीदांचा अपमान असल्याची टीकाही त्यांनी केली. न्यूज18 इंडियाच्या सुलगते सवाल या कार्यक्रमात झालेल्या चर्चेत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आहे. पंतप्रधानांनी शहीदांचा वापर करत मतं मागितली. आता त्यांच्याच पक्षाचा एक उमेदवार असा अपमान करतोच कसा असा सवालही त्यांनी केला.शहीदांचा अपमान करणाऱ्या साध्वी  प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा भाजपने निषेध करुन माफी मागितली पाहिजे अशी मागणी चर्चेत सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंग यांनी केली. भाजपसारख्या पक्षाला हे शोभत नाही असंही ते म्हणाले. प्रज्ञासिंह यांना त्रास दिला असेल तर ते निषेधार्ह आहे मात्र त्याचा अर्थ शहीदांचा अपमान सहन केला जाणार नाही असंही ते म्हणाले.

भाजपच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांना सर्वांची उत्तर देता देता तारांबळ उडाली. सर्वच मान्यवरांनी शायना यांना माफी मागण्याची मागणी केली. मात्र शायना यांनी त्यावर अतिशय गुळमुळीत उत्तर दिलं. कुणाच्या व्यक्तिगत मतांवर मी उत्तर देणार नाही असंही त्या म्हणाल्या.भाजपने सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आहे. अशी संतापजनक व्यक्तव्य करणाऱ्यांची उमेदवारी भाजप रद्द करणार का असा सवाल वकील फारुख खान यांनी केला. सर्वच स्तरातून टीकेचा भडीमार होत असल्याने भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी साध्वी यांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही असं स्पष्टिकरण दिल्याची माहितीही देण्यात आली. मात्र फक्त असं स्पष्टीकरण पुरेसं नाही तर साध्वींची उमेदवारी रद्द करा अशी मागणीही फारुख खान यांनी केली.

काय म्हणाल्या प्रज्ञासिंह

मध्य प्रदेशमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळहून उमेदवारी दिली आणि वाद सुरू झाला. त्यातच आता साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेतली.हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला, असं साध्वी म्हणाल्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारलं, असंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने हेमंत करकरेंना माझी सुटका करण्याची विनंती केली होती.

साध्वी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करावी, असं या पथकाने म्हटलं होतं पण आपल्याकडे साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबदद्ल पुरावे आहेत. त्यामुळेच मी त्यांना या खटल्यातून मुक्त करणार नाही, असं हेमंत करकरे म्हणाले होते याची आठवण साध्वी यांनी करून दिली. तुरुंगामध्ये आपला अतोनात छळ करण्यात आला, असाही आरोप त्यांनी याआधी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 07:43 PM IST

ताज्या बातम्या