VIDEO पित्रोदांना नाही तर राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे - नरेंद्र मोदी

VIDEO पित्रोदांना नाही तर राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे - नरेंद्र मोदी

राहुल आपल्या गुरूंवर रागावण्याचं फक्त नाटक करत आहेत. यांच्या मनात कायम शीख समाजाविषयी रागाचीच भावना आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 13 मे : राहुल गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांचं वक्तव्य काँग्रेसच्या चांगलच अंगलट आलंय. शेवटच्या टप्प्यात पंजाबमधल्या काही जागांवर निवडणूक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. 1984च्या दंगली प्रकरणी सॅम पित्रोदा यांना नाही तर राहुल गांधी यांना लाज वाटली पाहिजे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय.

पंजाबमधल्या भटिंडा इथं झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका केली. पंतप्रधान म्हणाले. राहुल आपल्या गुरूवर रागावण्याचं फक्त नाटक करत आहेत. यांच्या मनात कायम शीख समाजाविषयी रागाचीच भावना आहे. त्यामुळे उगाच पांघरून घालण्याचं काम करू नका असंही त्यांनी काँग्रेसला सुनावलं.

काँग्रेस दंगलखोरांना वाचवतेय

पंतप्रधान म्हणाले, काँग्रेसने 1984 च्या दंगलीला जबाबदार असलेल्यांना शिक्षा व्हावी यासाठी काहीही केलं नाही. त्यात ज्यांच्यावर आरोप होते त्या कमलनाथ यांना मध्यप्रदेशचं मुख्यमंत्री केलं असा आरोप त्यांनी केला. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने टीका होत असल्याने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर सभेत सॅम पित्रोदा यांच्यावर कोरडे ओढले होते. पित्रोदा जे म्हणाले त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी देशाची माफी मागावी असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं.

त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना फैलावर घेतलं. 1984च्या दंगलीप्रकरणी आत्ताच का प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यावेळी जे झालं ते झालं असं पित्रोदांनी म्हटलं होतं. त्यावरून निवडणुकीच्या प्रचाराची दिशाच बदलली आहे. भाजपने त्याचा फायदा घेण्यासाठी राहुल गांधी यांच्यावर तुफान हल्लाबोल केलाय.

First published: May 13, 2019, 7:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading