VIDEO 'होय, मी नरेंद्र मोदींचा व्देष करतो, ते प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत'

देशाला धोका देणाऱ्यावर राहुल गांधी प्रेम कसं करू शकतात. नरेंद्र मोदी प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 05:34 PM IST

VIDEO 'होय, मी नरेंद्र मोदींचा व्देष करतो, ते प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत'

नवी दिल्ली 08 मे : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेम करत असतील मी मात्र नरेंद्र मोदींचा व्देष करतो असं वादग्रस्त मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं. देशात हिंसेचं वातावरण पसरविणारे मोदी हे प्रेम करण्याच्या लायकीचे नाही असंही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांनी 'न्यूज18 इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर परखडपणे आपली मतं व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोफर्सच्या मुद्यावर राजीव गांधी यांच्यावर जी टीका केली त्याविषयी तुमचं मत काय आहे? असा प्रश्न केजरीवाल यांना विचारण्यात आला होता. केजरीवाल म्हणाले, या वादावर राहुल गांधी यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं मला अतिशय आश्चर्य वाटलं. तुम्ही कितीही द्वेष करा मी मात्र त्यांच्यावर प्रेमच करणार अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली होती.


Loading...


केजरीवाल पुढं म्हणाले, ज्या माणसाने पाकिस्तानशी हातमिळवणी केली. देशाशी गद्दारी केली, मॉब लिंचिंग केलं, व्देष पसरविला अशा माणसावर मी प्रेम करू शकत नाही आणि करणार नाही. हा माणूस प्रेम करण्याच्या लायक नाही. मी त्यांचा व्देषच करणार  असंही ते म्हणाले.पंतप्रधानपदासाठी कुणाला पसंती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान पदासाठी अतिशय योग्य उमेदवार आहेत. त्या पंतप्रधान होणार असतील तर त्याला माझा पाठिंबा आहे असंही केजरीवाल यांनी सांगितलं. मोदी आणि अमित शहा सोडून जे कुणी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी तयार असतील त्यांना माझा पाठिंबा असेल असंही ते म्हणाले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, कुमार विश्वास हे पुन्हा पक्षात येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असही त्यांनी स्पष्ट केलं.मोदींना हरविण्यासाठी काँग्रेसची साथ हवी

मनमोहनसिंग पंतप्रधान असताना केजरीवाल यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवलं होतं. त्यांच्यावर कठोर टीका केली होती. मात्र आज केजरावल आघाडी करण्यासाठी काँग्रेसला विनंती करत होते. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, हिटलरला हरविण्यासाठी सर्व विरोधीपक्ष एकत्र आले असते तर त्याचा पराभव झाला असता.आताही तशीच परिस्थिती आहे. मोदींना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र यायला पाहिजे होतं मात्र ते झाल नाही. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 12 मे रोजी दिल्लीतल्या सर्व 7 जागांवर मतदान होणार आहे.

VIDEO अक्षरमंत्र भाग 15 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - र, ल, व

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...