S M L
LIVE NOW

तिसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं- महाराष्ट्रात सरासरी 55.05 टक्के मतदान

Lokmat.news18.com | April 23, 2019, 7:14 PM IST
facebook Twitter google Linkedin
Last Updated April 23, 2019
auto-refresh

Highlights

नवी दिल्ली, 23 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2019च्या महासंग्रमातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. राज्यातील 14 मतदारसंघांसह देशातल्या एकूण 117 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या दिग्गाजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत गुजरात आणि केरळ राज्यातील सर्व जागांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरूर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खर्गे, रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बडे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कुठे-कुठे होणार मतदान?
तिसऱ्या टप्प्यामध्ये गुजरातमधील सर्व 26 जागा तर केरळ येथील सर्व 20 जागांवर मतदान झाले. यासोबत आसाममध्ये 4 जागा, बिहारमध्ये 5 जागा, छत्तीसगडमध्ये 7 जागा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 14 जागा, ओडिशामध्ये 6 जागा, उत्तर प्रदेशात 10 जागा, पश्चिम बंगालमध्ये 5 जागा, गोव्यात 2 आणि दादर नगर हवेली, दमन दीव आणि त्रिपुरामध्ये प्रत्येक 1-1 जागेचा समावेश आहे.
Load More

Live TV

News18 Lokmat
close