प्रियंका गांधींच्या 'दुर्योधन' टीकेवर अमित शहांनी दिली ही प्रतिक्रिया

प्रियंका गांधींच्या 'दुर्योधन' टीकेवर अमित शहांनी दिली ही प्रतिक्रिया

देशाचे लोकच आता 23 मे रोजी निर्णय करतील, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन.

  • Share this:

विष्णुपूर(पं.बंगाल) 07 मे : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुर्योधनाची उपमा दिली. त्यानंतर पुन्हा नवं राजकीय वादळ निर्माण झालं. लोकसभेच्या मतदानाचे आता फक्त दोन टप्पे राहिल्याने प्रचार पूर्ण शिगेला पोहोचलाय त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांचं युद्धही जोरदार भडकलंय. प्रियंका गांधी यांना आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदा प्रत्युत्तर दिलंय.

पश्चिम बंगालमधल्या विष्णुपूर इथं झालेल्या प्रचार सभेत अमित शहा म्हणाले, प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांना दुर्योधनाची उपमा दिली. लोकशाही असल्याने कुणी कुणावरही टीका करू शकतो. तुम्ही म्हटल्यामुळे कुणी दुर्योधन होत नाही. देशाचे लोकच आता 23 मे रोजी निर्णय करतील. कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन.काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

प्रियंका गांधींनी अंबालामधील सभेत पंतप्रधान मोदींना दुर्योधनाची उपमा दिली. दुर्योधनालाही असाच अहंकार होता आणि त्यानं दुर्योधनाचं आतोनात नुकसान झालं, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. कुणाचाच अहंकार टीकाला नाही तर तो मोदींचा तरी कसा टीकेल असं सांगत त्यांनी एक कविताही ऐकवली.


हा आहे सट्टाबाजाराचा अंदाज

लोकसभा निवडणुकांचे सगळे टप्पे झाल्यानंतर 23 मे ला निकाल येणार आहेत. पण कुणाचं सरकार येणार याबद्दल आत्तापासूनच अंदाज लावले जात आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालावर 12 हजार कोटी रुपयांचा सट्टा लागला आहे.

पूर्ण बहुमत नाही

सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षांमध्ये तुल्यबळ लढत आहे. या दोन पक्षांशिवाय तिसऱ्याच महागठबंधनला चांगल्या जागा मिळतील. या स्थितीत त्रिशंकू स्थितीही होऊ शकते.

NDA ला 220 जागांचा अंदाज

भाजपच्या नेतृत्वाखाली देशात एनडीए सरकार सत्तेत येऊ शकतं, असाही एक अंदाज आहे. एनडीएला 185 ते 220 जागा मिळतील तर यूपीएला 160 ते 180 जागा मिळतील, असं भाकित वर्तवण्यात येत आहे.

UPAला किती जागा?

भाजपला या निवडणुकीत एअर स्ट्राइकचा फारसा फायदा मिळणार नाही, असाही सट्टेवाल्यांचा अंदाज आहे. हेच सट्टेवाले निवडणुकीच्या आधी, भाजपला 250 जागा मिळतील, असं म्हणत होते.

सर्जिकल स्ट्राइकचा फायदा नाही

या निवडणुकीत सर्जिकल स्ट्राइक, राष्ट्रवाद, न्याय, राफेल हे सगळे मुद्दे गाजले. आता शेवटच्या दोन टप्प्यांत 118 जागांचं मतदान बाकी आहे तर 425 जागांवरचं मतदान पूर्ण झालं आहे.

तिसऱ्या आघाडीला निर्णायक जागा

एनडीए आणि यूपीएच्या तुलनेत महागठबंधन म्हणजेच तिसऱ्या आघाडीला चांगल्या जागा मिळतील, असं सट्टेवाल्यांना वाटतं. या तिसऱ्या आघाडीच्या जागा निर्णायक ठरतील.त्यामुळेच आत्ताच्या घडीला नेमकं सरकार कुणाचं येणार हे सांगता येत नाही, अशीच स्थिती आहे. तिसऱ्या आघाडीमध्ये चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी अशा नेत्यांचा समावेश आहे. त्रिशंकू लोकसभेच्या अंदाजामुळे याही पक्षांच्या हालचाली जोरात सुरू आहेत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 05:07 PM IST

ताज्या बातम्या