लोकसभा 2019: निकाल भारताचा, टेन्शन पाकिस्तानला!

लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय व्हावा याबद्दल पाकिस्तानी नागरिकांना काय वाटते?

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 10:47 AM IST

लोकसभा 2019: निकाल भारताचा, टेन्शन पाकिस्तानला!

नवी दिल्ली, 22 मे: जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील निवडणुकीच्या निकालावर अनेक देशांचे लक्ष आहे. ज्या देशांचे भारतातील निवडणुकीच्या निकालावर नजर आहे त्यामध्ये शेजारचा पाकिस्तानचा देखील समावेश आहे. भारतासोबतच्या सीमेवरील तणावामुळे पाकिस्तानात लोकसभा निवडणुकीबद्दल कमालीची उत्सुकता दिसून येते. पाकिस्तानमधील राजकीय पक्ष, लष्कर आणि आयएसआय यांना भारतात कोणाचे सरकार सत्तेत येणार याबद्दल उत्सुकता आहे. तसेच पाकिस्तानमधील ज्या कुटुंबियांचे भारतातील लोकांशी कौटुंबिक संबंध आहेत त्यांना देखील कोणाचा विजय होतोय हे जाणून घ्यायचे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला दणका दिला होता. त्यामुळेच पाकमधील नागरिकांना भारतात मोदी पुन्हा येऊ नये असे वाटते. अधिकतर पाकिस्तानी नागरिक टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत नको असे मत व्यक्त करत आहेत. लाहोर येथील रहिवासी असलेल्या शाही अलमने एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मोदी पुन्हा सत्ते येऊ नयेत, त्यांनी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्रईक केला होता. तर ऐजाजच्या मते, भारतात पुन्हा मोदीच सत्तेत येणार. पण त्यांना बहुमत मिळणार नाही. ही गोष्ट पाकिस्तानसाठी नक्कीच चांगली आहे.

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास दोन्ही देशांच्या दरम्यान चर्चा सुरु करण्याची चांगली संधी निर्माण होईल, असे म्हटले होते.

परदेशातील पाकिस्तानी लोकांना काय वाटते?

पाकिस्तानात राहणाऱ्या लोकांपेक्षा विदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची भारतातील निवडणुकीबद्दलची मते वेगळी आहेत. लंडनमध्ये राहणाऱ्या रियाज यांच्या मते, मोदींना पुन्हा सत्ता मिळाली पाहिजे. यामुळे पाकिस्तानच्या भूमीवरून सुरु असलेल्या दहशतवादी संघटनांना जबर बसेल. पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे.

Loading...


SPECIAL REPORT : उत्तर प्रदेशमध्ये 'हाती-सायकल' पडणार कमळावर भारी?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 10:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...