काँग्रेसनं राजस्थानच्या वाट्याचं पाणी पाकिस्तानला दिलं – नरेंद्र मोदी

काँग्रेसनं राजस्थानच्या वाट्याचं पाणी पाकिस्तानला दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 05:10 PM IST

काँग्रेसनं राजस्थानच्या वाट्याचं पाणी पाकिस्तानला दिलं – नरेंद्र मोदी

चित्तोडगड, 21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील चित्तोडगड येथे जाहीर सभेत काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. काँग्रेसनं आपल्या काळात राजस्थानच्या वाट्याचं पाणी पाकिस्तानला दिलं. त्यामुळे सध्या राजस्थानमध्ये पाण्याची कमी आहे. सिंधु जल कराराप्रमाणे जर का काँग्रेसनं पाणी अडवलं असतं तर राजस्थानमध्ये पाण्याची कमी जाणवली नसती असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. त्यामुळे सध्या देशाच्या राजकारणात आता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यासह पाण्याचा प्रश्न देखील चर्चिला जाऊ लागला आहे. दरम्यान, यापूर्वी पाटना येथे बोलताना देखील नरेंद्र मोदी यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात कसं परत आणलं याची माहिती दिली होती. भारत - पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसापासून तणावाचं वातावरण असून भारतानं पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे.


काय आहे भारत - पाकिस्तानचा पाणी वाद?

19 सप्टेंबर 1960 या दिवशी भारत - पाकिस्तानमध्ये सिंधु जलवाटप करार झाला. या करारनुसार भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या सहा नद्यांच्या पाणी वाटपावर निर्णय घेतला गेला. सिंधु, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या त्या नद्या होय. सिंधु, झेलम, चिनाब पूर्वेकडील आणि रावी, बियास आणि सतलज पश्चिमेकडली नद्या. करारनुसार पूर्वेकडील नद्यांवर भारताचा पूर्ण अधिकार राहिल तर पश्चिमेकडील नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला सोडावं लागेल.

अर्थात रावी, बियास आणि सतलज या नद्यांचं पाणी भारत विज निर्मितीसाठी वापरू शकतो. पण, शेतीसाठी वापरू शकत नाही. म्हणजेच काय तर भारताला रावी, बियास आणि सतलज या नद्यांचं पाणी वापरून पुन्हा नदीत सोडायचं आहे.

Loading...


'मोदी काय करणार हे पवारांना माहीत नसतं, मग इम्रान खानला कसं कळणार'


करारामुळे पाकिस्तानचा फायदा

या करारमुळे पाकिस्तनचाच फायदा झाला आहे. कारण सहा नद्यांचा विचार करता पाकिस्तानला 80 टक्के पाणी मिळतं. तर भारताला केवळ 20 टक्के. त्यामुळे नद्यांवरती धरणं बांधून पाणी रोखल्यास त्याचे परिणाम हे पाकिस्तानला भोगावे लागतील.


VIDEO : राज ठाकरेंच्या भाषणात 'तो' दम नाही - मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...