पी. चिदंबरम म्हणतात 'माझ्या घरावर, ऑफिसवर देखील होईल छापेमारी'

पी. चिदंबरम म्हणतात 'माझ्या घरावर, ऑफिसवर देखील होईल छापेमारी'

माझ्या घरावर आणि ऑफिसमध्ये देखील आयकर विभाग छापा मारू शकतं असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 08 एप्रिल : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या जवळच्या लोकांच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केली. जवळपास 30 तासांपेक्षा देखील जास्त काळ ही छापेमारी सुरू आहे. यामध्ये कमलनाथ यांचे ओसडी आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रविण कक्कड यांचा देखील समावेश आहे. यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील माझ्या घरावर आणि ऑफिसमध्ये आयकर विभाग छापा मारू शकतं असं म्हटलं आहे. तसेच आयकर विभागाचं आपण स्वागत करू असं देखील चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ट्विटरवरून त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली आणि मध्य प्रदेशमधील कक्कड यांच्याशी संबंधित असलेल्या 15 ठिकाणीदेखील आयकर विभागाने छापे टाकले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही मोठी कारवाई आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई, 'आयटी'कडून 30 तासांपासून धाडसत्र सुरूच

देभभरात 50 ठिकाणी छापे

देशभरात तीन राज्यांमध्ये जवळपास 50 ठिकाणांवर छाप टाकण्यात आला आहे. जवळपास 300 अधिकारी हे ऑपरेशन राबवत आहेत. आतापर्यंत एकूण 9 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. कमलनाथ यांच्या खासगी सचिवांचे खूप जवळचे मानले जाणारे प्रतीक जोशी यांच्याही घरावर छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. भोपाळ, इंदुर, गोवाव्यतिरिक्त दिल्लीतील 50 ठिकाणांवर छापा टाकण्यात आला आहे. प्रतीक जोशी यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोखरक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सीआरपीएफ आणि मध्य प्रदेश पोलीस भिडले

मध्य प्रदेशातही पश्चिम बंगालप्रमाणे स्थानिक पोलीस आणि केंद्रीय संस्था आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. छाप्प्यादरम्यान मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारचे पोलीस आणि सीआरपीएफचे जवान आपापसांत भिडले. याव्यतिरिक्त स्थानिक पोलिसांनी भोपाळ आणि इंदुरमध्ये आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणीदेखील घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. भोपाळमध्ये प्लेटिनम प्लाझा येथे आयकर विभागानं छापा टाकत कारवाई केली. यादरम्यान, स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफचे जवान आपापसांत भिडले.

काश्मिरी युवक आणि जवानांमध्ये तणाव, थेट घटनास्थळावरील VIDEO आला समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading