महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश...लोकसभेसाठी सर्वात महत्त्वाच्या राज्यांत कुणाला किती जागा?

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश...लोकसभेसाठी सर्वात महत्त्वाच्या राज्यांत कुणाला किती जागा?

या सर्वेनुसार, महाराष्ट्रात एनडीएच्या काही जागा कमी होत असल्या तरीही त्यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत फार मोठं नुकसान होणार नाही, असं दिसतंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 एप्रिल : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्ष जोर लावताना दिसत आहे. अशातच काही ओपिनियन पोलमधून देशातील जनतेच्या मनात काय चाललंय, याबाबतचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता एका खासगी वृत्तवाहिनी आणि सी-वोटर यांनी लोकसभा निवडणुकांबाबत केलेला सर्व्हे समोर आला आहे.

या सर्वेनुसार, महाराष्ट्रात एनडीएच्या काही जागा कमी होत असल्या तरीही त्यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत फार मोठं नुकसान होणार नाही, असं दिसतंय. कारण महाराष्ट्रात महायुतीला 35 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये भाजपला 21 तर शिवसेनेला 14 जागा मिळू शकतात. तर महाआघाडीला 13 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसला 8 तर 5 मतदारसंघांत राष्ट्रवादी विजय मिळवेल, असा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठं नुकसान होताना दिसत आहे. कारण उत्तर प्रदेशात एनडीएला 32 तर महागठबंधनला 44 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काय असू शकते देशातील स्थिती?

कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळणार नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्व्हेनुसार, देशात भाजपप्रणित एनडीएला 267 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजे पुन्हा पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मोदींसाठी हा धक्का आहे. कारण बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता असते.

दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएसाठीही या सर्व्हेतील निष्कर्ष फारसा आनंद देणार नाही. कारण युपीएला फक्त 142 जागांचा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. तर इतरांच्या जागांमध्ये मात्र लक्षणीय वाढ झाली असल्याचं चित्र आहे. इतर पक्षांना 134 जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रत्येक आघाडीला मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या विचार केला तर, एनडीएला 42 टक्के, युपीएला 31 टक्के तर इतरांना 27 टक्के मते मिळतील, असं या ओपिनियन पोलमधून समोर आलं आहे.

मोकाट वळूने रस्त्यावरच उचलून फेकल्याने नागरिकाचा मृत्यू, भयानक VIDEO समोर

First published: April 7, 2019, 8:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading