‘नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास अयोध्येत जाऊन आत्महत्या करेन’

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास आत्महत्या करेन असं वसीम रिझवी यांनी म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 03:56 PM IST

‘नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास अयोध्येत जाऊन आत्महत्या करेन’

भोपाळ, 30 एप्रिल : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा उत्साह पाहायाला मिळत आहे. आरोप – प्रत्यारोपांनी सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवाय देशप्रेमी आणि देशद्रोही यावर देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा झडताना दिसत आहेत. सध्या देशात सर्वात जास्त चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? यावर बोलताना वसीम रिझवी यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास अयोध्येमध्ये जाऊन आत्महत्या करेन असं वसीम रिझवी यांनी म्हटलं आहे. वसीम रिझवी हे उत्तर प्रदेशातील शिया सेंट्रल वफ्क बोर्डाचे अध्यक्ष आहेत. मंगळवारी बोलताना त्यांनी 2019मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास अयोध्येमध्ये जाऊन आत्महत्या करेन. ज्यावेळी राष्ट्रहिताबाबत बोललं जातं तेव्हा कंटरपंथी मला जीवे मारण्याची धमकी देतात. मोदी सरकार गेल्यानंतर तुझे तुकडे – तुकडे करू अशी धमकी देतात. असं म्हटलं आहे.


या भारतीय विमान कंपनीला पाकिस्तानमुळे झालं 300 कोटींचं नुकसान

आणखी काय म्हणाले रिझवी

देशप्रेमींमध्ये नरेंद्र मोदींबद्दल प्रेम तर गद्दारांमध्ये भीती आहे. मोदी देशाचे चांगले पंतप्रधान आहेत. 2019 मध्ये कोणत्याही पक्षाचा नेता देशद्रोही लोकांच्या मदतीनं पंतप्रधानपदी बसल्यास मी अयोध्येमध्ये जात आत्महत्या करेन. कारण देशद्रोह्यांच्या हातून मरण्यापेक्षा शानमध्ये मेलेलं केव्हाही चांगलं असल्याचं वसीम रिझवी यांनी म्हटलं आहे.

Loading...

यापूर्वी देखील वसीम रिझवी आपल्या विधानांमुळे चर्चेत राहिलेले आहेत.


VIDEO VIRAL: पोलीस वडिलांना थांबवणाऱ्या या चिमुकल्याला पाहून तुम्हीही व्हाल भावुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...