निवडणुकीनंतर BJDसाठी सर्व पर्याय खुले - नवीन पटनायक

निवडणुकीनंतर BJDसाठी सर्व पर्याय खुले - नवीन पटनायक

'लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो पक्ष ओरिसाच्या विकासाच्या मदतीची हमी देईल त्यांना आमचा पाठिंबा असेल.'

  • Share this:

भुवनेश्वर 21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीनंतर बीजू जनता दलासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याकडचे पत्ते राखून ठेवल्याचं बोललं जातंय. गेल्या 15 वर्षांपासून ते राज्यात सत्तेत आहेत. पटनायक यांचा हा विक्रम असून ओरिसात लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत.

ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पटनायक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो पक्ष ओरिसाच्या विकासाच्या मदतीची हमी देईल त्यांना आमचा पाठिंबा असेल. भाजपला किंवा काँग्रेस यापैकी कुणाला  पाठिंबा देणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. बीजेडीला कुणीही वर्ज्य नाही. ओरिसातल्या जनतेचं कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे असंही ते म्हणाले.ओरिसात लोकसभेच्या 21 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व देशात मोदी लाट असतानाही बीजेडीने ओरिसात 20 जागा मिळवल्या होत्या तर भाजपला फक्त 1 जागा मिळाली होती. या वेळी भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असं असलं तरी बीजेडीलाही चांगल्या जागा मिळतील अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.सध्याचं राजकीय वातावरण बघता केंद्रात NDA ला काही जागा कमी पडल्यास बीजेडीची मदत मिळू शकते असं म्हटलं जाते. अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना नवीन पटनायक हे केंद्रात मंत्री होते. त्यामुळे त्यांनी आपले सर्व पत्ते राखून ठेवले असून निवडणुकीनंतरच ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.नरेंद्र मोदींना आपण अनेक वेळा भेटलो आहे. त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. सोनिया गांधी यांच्याशी फारसं बोलणं होत नाही आणि राहुल गांधी यांची कधी भेट झाली नाही असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 08:41 PM IST

ताज्या बातम्या