Elec-widget

EXIT POLL 2019 : ओडिशात नवीन पटनायकांना धक्का, भाजपलाही फायदा होणार!

EXIT POLL 2019 : ओडिशात नवीन पटनायकांना धक्का, भाजपलाही फायदा होणार!

सलग चार वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळणारे नवीन पटनायक यांचा करिष्मा या राज्यात कायम असला तरी त्यांना यावेळी लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय.

  • Share this:

नवी दिल्ली 19 मे :  लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्यातलं महत्त्वाचं राज्य म्हणजे ओडिशा. ओडिशामध्ये लोकसभेच्या 21  जागा आहेत. त्यात अनुसूचित जातींसाठी ३ अनुसूचित जनजातींसाठी ५ जागा आरक्षित आहेत. सलग चार वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळणारे नवीन पटनायक यांचा करिष्मा या राज्यात कायम असला तरी त्यांना यावेळी लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने जोर लावला होता. बीजेडीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत नवीन पटनायक यांची एकाधिकारशाही असल्याचा आरोप केलाय.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही ओडिशात भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना धक्का बसला. मात्र त्यांचा प्रभाव कायम असल्याचं स्पष्ट होतंय. मात्र गेल्या १५ वर्षांपासून सरकारमध्ये असल्याने आता सरकारबद्दल नाराजी निर्माण झाली आहे. बीजीडीमध्ये पहिल्यासारखी शिस्तही राहिली नाही. त्यामुळे त्याचा पटनायक यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

नवीन पटनायक कुणाच्या बाजूने?

नवीन पटनायक यांनी आपले पत्ते अजुन उघड केलेले नाहीत. आघाडीच्या राजकारणात काही जागा कमी पडल्या तर ते कुणाच्या बाजूने जातील याबद्दल सगळयांना उत्सुकता आहे. निवडणुकीआधी विरोधीपक्षांची महाआघाडीची तयारी सुरू असतानाही त्यांनी त्याबाबत फारसा रस दाखवला नाही. तर भाजपबद्दलही ते तटस्थच राहिले.

ओडिशाच्या विकासासाठी जे कुणी मदत करतील त्यांना आपला पाठिंबा असेल असं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दलची संदिग्धता त्यांनी कायम राखली. पटनायक यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री म्हणून कामही केलं आहे. तर पहिल्यांदा ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी भाजपसोबत निवडणूक लढविली होती.

Loading...

फानी चक्रिवादळ आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाची हवाई पाहाणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारचं त्यांनी कौतुकही केलं होतं. त्यावेळी नवीन पटनायकही त्यांच्या सोबत होते. त्यामुळे गरज पडली तर नवीनबाबू मदत करतील असं भाजपला वाटतंय.

असे आहेत या आधीचे निकाल

२०१४ मध्ये बीजेडीला २० तर भाजपला १ जागा मिळाली होती. २००९ मध्ये बीजेडी १४ काँग्रेस ६ तर सीपीआयला १ जागा मिळाली होती. २००४ च्या निवडणुकीत बीजेडीला ११, भाजपला ७ तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 08:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...