‘नरेंद्र मोदींना PM बनण्यापासून जगातील कोणतीच ताकद रोखू शकत नाही’

‘नरेंद्र मोदींना PM बनण्यापासून जगातील कोणतीच ताकद रोखू शकत नाही’

नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

पाटणा, 07 मे : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी दिसतील. 23 मे रोजी जगातील कोणतीच ताकद त्यांना पुन्हा पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकत नाही असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. पाटणामधून रविशंकर प्रसाद हे  लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तसंच NDA 400 जागा जिंकेल असा दावा देखील यावेळी रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. पाटणामधून भाजप सोडून काँग्रेसचा हात धरलेल्या शत्रुघ्न सिंन्हा यांचं रविशंकर प्रसाद यांना आव्हान असणार आहे. यंदा भाजपला 2014 प्रमाणे जागा मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे. पण, भाजपला सत्तेत येण्याचा विश्वास आहे. देशात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे निकाल हे 23 मे रोजी लागणार आहेत.

‘राजीव गांधींबद्दल नरेंद्र मोदींचं ‘ते’ विधान चुकीचं’; भाजप नेत्याचा घरचा अहेर

महाआघाडीवर निशाणा

यावेळी रविशंकर प्रसाद यांनी महाआघाडीवर देखील निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधक घाबरले आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश विकास करत आहे. हे विरोधकांच्या पचनी पडत नसल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. शिवाय, देशात सध्या नरेंद्र मोदी यांची हवा असल्याचं देखील रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

भाजपविरोधकांची एकी

लोकसभा 2019 करता विरोधकांनी एकी केली आहे. काहीही करून भाजपला सत्तेपासून रोखायचं यासाठी सध्या विरोधक जोरात प्रचार करताना दिसत आहे. देशात पाच टप्प्यांचं मतदान पूर्ण झालं आहे. 2014मध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं होतं. विरोधकांनी नरेंद्र मोदी देशात हुकूमशाही राबवत असल्याचा आरोप केला आहे. मोदी दिलेल्या वचनांवर का बोलत नाहीत? असा सवाल देखील आता विरोधक विचारत आहेत.

VIDEO: भाजपच्या प्रचाराचे मुद्दे काँग्रेसकडून हायजॅक

First Published: May 9, 2019 02:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading