News18 Lokmat

निवडणुकीचे पुढचे पाच टप्पे निर्णायक ठरणार, 356 जागांवर लढाई

मंगळवारी 23 एप्रिलला 14 राज्यांमधल्या 115 जागांवर मतदान होईल त्यात महाराष्ट्रातल्या 14 जागांचा समावेश आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 11:25 PM IST

निवडणुकीचे पुढचे पाच टप्पे निर्णायक ठरणार, 356 जागांवर लढाई

लखनऊ 22 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान मंगळावारी होत आहे. यात 14 राज्यांमधल्या 115 जागांवर मतदान होईल त्यात महाराष्ट्रातल्या 14 जागांचा समावेश आहे. पुढच्या पाच टप्प्यामध्ये 356 जागांवर मतदान होणार असून 2014 मध्ये त्यातल्या 223 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. उत्तर प्रदेशातल्या 10 जागांसाठी मंगळवारी होणाऱ्या मतदानात यादव कुटुंबातल्या महत्त्वांच्या जागांचा समावेश आहे.

2014 च्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे त्यातल्या 80 टक्के जागा या पाच टप्प्यातून मिळाल्या होत्या. त्यामुळे या सर्व जागा कायम राखण्याचं आव्हा भाजपला पार पाडावं लागणार आहे.

नरेंद्र मोदींची लोकप्रियता

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या एकत्रित लोकप्रियतेपेक्षा जवळपास दुप्पट होती. ३६ टक्के लोकांनी मोदींना तर काँग्रेसच्या या तीन दिग्गज नेत्यांना १९ टक्के लोकांनी पसंती दिली. भाजपने २०१४ मध्ये जिंकलेल्या २८२ जागांपैकी १३७ जागांमध्ये अर्ध्याहून जास्त मतं मिळाली होती.

१६९ जागांमध्ये भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या एकत्रित टक्केवारीपेक्षा जास्त आहे.

Loading...

चार पैकी तीन जागांवर (७३ टक्के) भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेली आघाडी ही एक लाखांपेक्षा जास्त मतांची आहे. पाच पैकी तीन ठिकाणी भाजपने काँग्रेसला हरवलंय.


भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ

पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर भाजपला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली मतांची टक्केवारी ही काँग्रेसपेक्षा जास्त होती. वाजपेयी पंतप्रधान असताना झालेल्या निवडणुकांमध्येही मिळालेल्या मतांचं प्रमाण हे भाजपपेक्षा काँग्रेसचे जास्त होते.

२००९ च्या निवडणुकीपासून फक्त पंजाब या राज्यातच भाजपच्या मतांची टक्केवारी कमी झाली. तर सर्वाधिक वाढ उत्तर प्रदेशात झाली. २०१४ मध्ये भाजपला २४.८ टक्के एवढी मतं मिळाली.

सहा राज्यांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी भाजपला अर्ध्याहून जास्त मतं मिळाली होती. गुजरात, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा आणि हिमाचल प्रदेश ही ती राज्य आहेत.

गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गोवा या सहा राज्यांमध्ये भाजपला सर्व जागा मिळाल्या होत्या.

भाजपने शहरी भागांमध्ये दोन तृतीयांश ५७ पैकी ३७ तर ग्रामीण भागातल्या अर्ध्याहून जास्त ३४२ पैकी १७८ जागा जिंकल्या होत्या.

पाचपैकी दोन मुस्लिमांनी काँग्रेसला मत दिलं तर उच्च जातींच्या हिंदूंमध्ये दोन पैकी एकाने भाजपला मत दिलं.

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या (१८ ते २२ वयोगट) ३६ टक्के तरुणांनी भाजपला मतदान केलं. तर काँग्रेसला केवळ १७ टक्के तरुणांनी मत दिलीत.

नऊ राज्यांमध्ये NDA ला ९० टक्क्यांहून जास्त तर सहा राज्यांमध्ये सर्व जागा मिळाल्या.

गुजरात २६/२६

राजस्थान २५/२५

दिल्ली ७/७

उत्तराखंड ५/५

हिमाचल प्रदेश ४/४

गोवा २/२

मध्य प्रदेश २७/२७

उत्तर प्रदेश ७३/८०

पंजाब ९/१०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 11:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...