वायनाडमधून ही व्यक्ती देणार राहुल गांधींना आव्हान

राहुल गांधींविरोधात वायनाड येथून NDAनं आपला उमेदवार जाहीर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 03:19 PM IST

वायनाडमधून ही व्यक्ती देणार राहुल गांधींना आव्हान

नवी दिल्ली, 01 एप्रिल : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठीसह आता केरळमधील वायनाड या मतदारसंघातूनही लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजप कुणाला मैदानात उतरवणार, याचा निर्णय आता झाला आहे. भारत धर्मजन सेनेचे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली आता राहुल गांधी यांना आव्हान देणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे आता वायनाडमधील सामना हा राहुल गांधी विरूद्ध तुषार वेल्लापल्ली असा रंगणार आहे.
काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान

दरम्यान,  दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवावी असं आव्हान काँग्रेसनं नरेंद्र मोदी यांना दिलं होतं. पराभव दिसू लागल्यानं आता काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाड येथून लढत असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. त्याला काँग्रेसनं देखील प्रत्युत्तर दिलं होतं.


केरळमधून डाव्याचं राहुल गांधी यांना आव्हान

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता अमेठीसह केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यावर आता उलट-सुलट राजकीय प्रतिक्रिया देखील पुढे येत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांचा निर्णय केरळचे मुख्यमंत्री के. विजयन यांना पटलेला नाही. काँग्रेसच्या घोषणेनंतर त्यांनी त्यावर टीका केली आहे. शिवाय, आपली नाराजी व्यक्त करताना राहुल गांधी यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी डाव्यांना आव्हान दिलं असून त्यांनी भाजपाविरोधात लढायला हवं होतं. पण, ते आता डाव्यांना आव्हान देत आहेत अशी प्रतिक्रिया के. विजयन यांनी दिली आहे. शिवाय, प्रकाश करात यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.


VIDEO: आपल्या वाढदिवसानिमित्त आठवेलेंनी मोदींवर केली 'ही' कविता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...