• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ‘मोदींचं काम नव्या नवरीप्रमाणे; बांगड्यांचा आवाजच जास्त’

‘मोदींचं काम नव्या नवरीप्रमाणे; बांगड्यांचा आवाजच जास्त’

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण होऊ शकतो.

 • Share this:
  इंदूर, 11 मे: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे नेते आणि पंजाब मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान मोदींवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. सिद्धूंनी मोदींची तुलाना नववधुशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धूंनी भाजप आणि खासकरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका सुरु केली आहे. पंजाबमध्ये 19 तारखेला मतदान होत आहे. त्याआधी सिद्धूंनी मोदींवर हल्ला चढवला आहे. 'मोदींचे काम म्हणजे नव्या वधुसारखे आहे. जी चपात्या कमी करते. पण, तिच्या बांगड्यांचा आवाज जास्त येतो. मोदी काम कमी आणि प्रचार जास्त करतात, असं विधान सिद्धू यांनी केलं. BJP – काँग्रेसला बहुमत न मिळाल्यास या पाच जणांच्या हाती सत्तेच्या चाव्या! आणख काय म्हणाले सिद्धू? याआधी शुक्रवारी इंदूर येथील सभेत मोदी खोटं बोलत नाहीत तर त्यांची पूर्ण टीमच खोटारडी आहे. गेल्या पाच वर्षात लोकांना ना राम मिळाला, ना रोजगार मिळाला. तर, प्रत्येक गल्लीत मोबाईल हातात धरलेले बेरोजगार तरुण दिसत आहेत, अशी टीका त्यांनी केली. प्रचारादरम्यान सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी काळा पैसा, राम मंदिर या विषयावर का बोलत नाहीत? शिवाय, नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी, जीएसटी आणि रोजगाराच्या मुद्यावर निवडणूक लढवावी असं आव्हान देखील यावेळी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलं. IAS, IPSची परिक्षा देण्यासाठी हत्या प्रकरणातील कैदी जाणार विमानानं सिद्धू यांना होती प्रचारबंदी दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांनी राफेल करारावरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसंच राष्ट्रीयकृत बँकांना लुटण्यासाठी आणि देशाबाहेर पळण्यासाठी मोदींनी श्रीमंतांना मदत केली असं विधान केलं. त्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांना 72 तासांसाठी प्रचारबंदी देखील केली होती. नवीन फिल्म फेकु नंबर 1 मी आत्तापर्यंत कुली नंबर 1, हिरो नंबर 1 हे चित्रपट पाहिले. पण, आता फेकु नंबर 1 चित्रपट येत असल्याची टीका देखील नवज्योत सिंग सिद्धू यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. वर्णभेदी विधान काँग्रेसनं स्वातंत्र्य संग्रामात गोऱ्या इंग्रजांना देशातून हाकलून दिलं. पण, तुम्ही आता काळ्या इंग्रजांना देशातून हाकलून लावा असं विधान नवज्योत सिंग सिद्धू यांनी इंदूर येथे प्रचारादरम्यान केलं. VIDEO: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना धू-धू धुतलं, पोलिसांनीही केले हात साफ
  First published: