नरेंद्र मोदी, मच्छर, हाती आणि नवज्योत सिंग सिद्धू यांची शायरी

नरेंद्र मोदी, मच्छर, हाती आणि नवज्योत सिंग सिद्धू यांची शायरी

नवज्योत सिंग सिद्धू यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

  • Share this:

भोपाळ, 29 एप्रिल : देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, आज ( 29 एप्रिल ) चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता सर्वच पक्ष जोरदार आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोप – प्रत्यारोपांची राळ देखील उठत आहे. आपल्या शेरोशायरी अंदाजसाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे नेते आणि पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी शायरीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. भोपाळ येथे बोलत असताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी मच्छरला कपडे घालणे, हातीला कुशीत घेणं आणि तुमच्याकडून खरं बोलण्याची अपेक्षा करणं कठीण असल्याची टीका केली आहे. यापूर्वी देखील सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तर, भाजपमध्ये असताना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत सिद्धू यांनी काँग्रेसचा हात धरला होता.

पाकिस्तानची ऑफर; ‘भारतीय मीडियानं बालाकोटला भेट द्यावी’

जोरदार प्रचार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद देखील निर्माण झालेले आहेत. सिद्धू यांनी मतदारांना मत देण्याचं आवाहन तर केलं पण त्यातही त्यांनी नरेंद्र मोदींना चायवाला, पकौडेवाला आणि चौकिदार अशा शब्दांवरून टोले मारले. 'एक चुकीचं मत तुमच्या मुलाला चहावाला, पकौडेवाला किंवा चौकीदार बनवू शकतं', असं ट्वीट नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलं आहे. मतदान करून पस्तावण्यापेक्षा तुम्ही आधीच तयारी करा आणि चुकीचा निर्णय घेण्यापासून स्वत:ला वाचवा, अशी टिप्पणी सिद्धू यांनी ट्विटरवर केली आहे.

सनी देओलवर तब्बल 53 कोटींचं कर्ज; तर संपत्ती...

'पुलवामा'नंतर वाद

पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टिकेची राळ उठली होती. पुलवामा हल्ल्याबदद्ल पाकिस्तानातल्या सगळ्याच लोकांना दोषी ठरवता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर सिद्धू यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी विरोधकांनी केली होती. या वक्तव्यामुळे सिद्धू यांना कपिल शर्मा शो मधूनही काढून टाकण्यात आलं होतं. हा वाद संपत नाही तोच सिद्धू यांनी आणखीही वादग्रस्त वक्तव्यं केली होती. आता त्यात या नव्या वाक्याची भर पडली आहे.

SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा 'X फॅक्टर', आता पुढची तयारी...

First published: April 29, 2019, 9:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading