...आणि म्हणून सिद्धू नाराज झाले, 20 दिवसांपासून केले काम बंद!

...आणि म्हणून सिद्धू नाराज झाले, 20 दिवसांपासून केले काम बंद!

काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू कामधंदा सोडून गप्प बसले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 एप्रिल: काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू कामधंदा सोडून गप्प बसले आहेत, असे कोणी सांगितले तर त्यावर तुमचा थोडाही विश्वास बसणार नाही. 'द कपील शर्मा शो' असो की अन्य टीव्हीवरील शोमध्ये सर्वात जास्त बोलणारे इतक नव्हे तर राजकीय सभांमध्ये देखील शोरो शायरी करणारे सिद्धू गेल्या 20 दिवसांपासून शांत बसले आहेत. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिद्धू असे का शांत बसलेत असा प्रश्न काँग्रेससह सर्वांनाच पडला आहे.

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने चंदीगड लोकसभा मतदारसंघातून पत्नी नवजोत कौर यांना उमेदवारी न दिल्याने सिद्धू नाराज झाले आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसने पवन बंसल यांना उमेदवारी दिली आहे. त्याआधी अशी चर्चा होती की कौर यांनी अमृतसर येथून उमेदवारी दिली जाईल. याच मतदारसंघातून अमरिंदर सिंह यांनी 2014च्या निवडणुकीत अरुण जेटलींचा पराभव केला होता. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत अमृतसरमधून गुरजीत सिंग ओजला यांना तिकीट दिले आहे. विशेष म्हणजे 2014मध्ये अमृतसरमधून जेटलींना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या सिद्धू यांनी भाजपला रामराम केला होता.

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत सिद्धू काँग्रेसमध्ये गेले. दरम्यान, राज्यातील राहुल गांधी यांच्या रॅलीत बोलण्यासाठी सिद्धू यांना बोलवण्यात आले नसल्याने ते नाराज झाले आहेत. तर छत्तीसगडमधील स्टार प्रचारकांच्या यादीत देखील त्यांचे नाव नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धू यांनी संपूर्ण देशभरात निवडणुकीचा प्रचार करण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सिद्धू आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात वाद सुरु आहेत. त्यातच सिद्धू यांनी पाकिस्तान आणि इमरान खान यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर पक्ष देखील नाराज आहे. म्हणून काँग्रेसने सिद्धू यांना प्रचारापासून चार हात लांब ठेवले आहे. काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत यंदा मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची पत्नी आणि माजी केंद्रीय मंत्री परणीत कौर यांना पटियालातून उमेदवारी दिली आहे.

पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आहेत. 2014मध्ये यापैकी प्रत्येकी 4 जागा काँग्रेस आणि 'आप'ला मिळाल्या होत्या. तर भाजप आणि आघाडीला 5 जागा मिळाल्या होत्या.


VIDEO: उचलली जीभ : 'या' भाजप नेत्याचा दांडगा उत्साह एकदा पाहाचबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 12:24 PM IST

ताज्या बातम्या