वाराणसी हे फक्त निमित्त, उत्तर प्रदेश हेच नरेंद्र मोदीचं लक्ष्य

वाराणसी हे फक्त निमित्त, उत्तर प्रदेश हेच नरेंद्र मोदीचं लक्ष्य

नरेंद्र मोदी हे अजुनही देशातले खर्दी खेचणारे सर्वात मोठे नेते आहेत.

  • Share this:

वाराणसी 25 एप्रिल  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो ने वाराणसीतलं वातावरण गुरुवारी वातावरण ढवळून निघालं. बनारस विश्व हिंदू विद्यापीठाच्या समोर असलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी जमलेल्या अफाट गर्दीलाही वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी रोड शोला सुरुवात केली.

नरेंद्र मोदी हे अजुनही खर्दी खेचणारे सर्वात मोठे नेते आहेत. वारणसीत मोदींना काहीही धोका नसला तरी या शक्तिप्रदर्शनाचा राहिलेल्या चार टप्प्यांवर परिणाम पाडण्याचं लक्ष्य नरेंद्र मोदींचं आहे असं मत भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केलं. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहे. रोड शोच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातल्या राहिलेलेल्या जागांवरही परिणाम होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या वाराणसीतून मोदींना टक्केर देतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र काँग्रेसने या जागेवरून अजय राय यांना पुन्हा तिकीट दिलंय. 2014 मध्येही काँग्रेसने त्यांनाच मैदानात उतरवलं होतं.

तर गंगा अजूनही अस्वच्छ आहे. मोदींनी दत्तक घेतलेलं खेडं भकास आहे तिथे काहीच विकास झाला नाही असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, लोकमतच्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक किरण अग्रवाल, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी  यांनी सहभाग घेतला.

मराठी मतदार

वाराणसीत सात हजार मराठी नागरिक राहतात तर सर्व उत्तर प्रदेशात सात ते आठ लाख मराठी नागरिक राहतात. गेल्या अनेक दशकांपासून ही मंडळी उत्तर प्रदेशात राहतात. तर वाराणसीत काही मराठी कुटुंब गेल्या 100 वर्षांपासूनही वास्तव्याला आहेत.

कडक सुरक्षा व्यवस्था

यासाठी एकूण 10 हजार पोलीस कर्मचारी आणि इतर सुरक्षा दलांचे जवान तैनात करण्यात आले होते.  एक हजार पोलीस कर्मचारी साध्या वेशात नजर ठेवून होते. पंतप्रधानांना एसपीजीचे सुरक्षा कवच असल्याने त्यांचे अधिकारीही वाराणसीत तळ ठोकून आहेत. 15 आयपीएस अधिकारी आणि एसपीजीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या सुरक्षेच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे.

रोड शोच्या मार्गावर जी दुकानं आणि घरं आहेत, त्यांच्या मालकांची पडताळणी करण्यात आलीय. इतर घरांवर ड्रोनच्या सहाय्यानं नजर ठेवण्यात आली होती. गच्चीवर वीट, दगड तसंच काठ्या ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व हॉटेल्सकडून पर्यटकांची सविस्तर यादी मागवण्यात आली आहे. गुप्तचर विभागाचे 150हून जास्त अधिकारीही वाराणसीत आहेत. रोड शो दरम्यान ते गर्दीत मिसळून करडी नजर ठेवतील.

'एनडीए'च्या नेत्यांची उपस्थिती

26 एप्रिलला पंतप्रधान सकाळी साडे अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यावेळी भाजपच्या मित्रपक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, रामदास आठवले यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

First published: April 25, 2019, 5:54 PM IST

ताज्या बातम्या