VIDEO निवडणुकीत भाजपला मिळतील 242 जागा, मनमोहन सिंग यांच्या माजी सल्लागाराचा अंदाज

VIDEO निवडणुकीत भाजपला मिळतील 242 जागा, मनमोहन सिंग यांच्या माजी सल्लागाराचा अंदाज

'लोकांचा नरेंद्र मोदी यांच्यावर अजुनही विश्वास आहे.मोदींनी पाकिस्तानाला त्यांच्या घरात घुसून मारलं असं लोकांना वाटतं.'

  • Share this:

नवी दिल्ली 29 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झालेत. तर तीन टप्प्याचं मतदान बाकी आहे. या निवडणुकीत नेमकं काय होणार याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. या निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष भाजपच राहणार असून त्यांना 242 जागा मिळतील असा अंदाज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी व्यक्त केलाय. 'सीएनबीसी आवाज'च्या 'चुनावी अड्डा' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

बारू म्हणाले, नरेंद्र मोदी हे नॅशनल ब्रॅण्ड आहेत. अशी प्रतिमा तयार करण्यात अजुनी अन्य कुणाला नेत्याला यश आलं नाही. राहुल गांधी यांना सुद्धा अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश आलं नाही. दक्षिणेत प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व आहे. मात्र इतर भागात मोदी अजुनही ब्रॅण्ड आहेत. त्याचा फायदा भाजपला मिळणार आहे.भाजप सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल. मात्र 2014 मध्ये जी लाट होती तशी लाट सध्या नाही. त्यामुळे तसं यशही मिळणं अवघड आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

बेरोजगारी, शेतीचे प्रश्न, अर्थव्यवस्था अशा अनेक प्रश्नांवर लोक नाराजी व्यक्त करतात. मात्र मत कुणाला देणार असा प्रश्न विचारल्यावर त्यांचं उत्तर नरेंद्र मोदी हेच असतं. लोकांचा नरेंद्र मोदी यांच्यावर अजुनही विश्वास आहे असं मत CSDS या संस्थेचे संचालक संजय कुमार यांनी व्यक्त केलं.

काँग्रेसने प्रियंका गांधी निवडणूक लढविणार असे संकेत दिले आणि नंतर निवडणूक रिंगणातून माघार घेतली. असे करून काँग्रेसने मोठी चूक केल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, लोक नाराजी व्यक्त करत असले तरी मत मात्र मोदींनाच देणार असं ते म्हणातात.

मोदींनी पाकिस्तानाला त्यांच्या घरात घुसून मारलं असं लोकांना वाटतं. मोदींना हे माहित आहे. लोकांना हा विषय अपील होतो असं त्यांना वाटतं त्यामुळे ते हा विषय उपस्थित करत आहेत.

CSDS या संस्थेचे संचालक संजय कुमार म्हणाले, अजुनही देशातल्या 170 जागांवर मतदान होणं बाकी आहे. 2014मध्ये यातल्या बहुतांश जागेवर भाजपने विजय मिळवीला होता. बंगालमध्ये भाजपला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. इतर ठिकाणी जे नुकसान होईल ते बंगालमधून भरून काढू असं भाजपला वाटतं.

First published: April 29, 2019, 11:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading