वाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स

वाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स

'प्रियंका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तरी त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. उलट त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल.'

  • Share this:

नवी दिल्ली 18 एप्रिल : लोकसभेच्या निवडणुकांचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत मात्र अजुनही काँग्रेसने वाराणशीत आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. प्रियंका गांधी यांना शेवटच्या क्षणी उमेदार म्हणून घोषीत केलं जाऊ शकतं अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र अजुनही काँग्रेसने त्यावर सस्पेन्स कायम ठेवला आहे. वारणशीत तिथली जनताच नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध मुख्य उमेदवार आहे अशी भूमिका काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेरा यांनी आज मांडली. 'न्यूज18 इंडिया'च्या 'हम तो पुछेंगे' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाराणशीत अजुन समाजवादी आणि बसपा आघाडीनेही आपला उमेदवार घोषीत केला नाही.  आघाडी योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करेल. काँग्रेसने सस्पेन्स ठेवलाय त्यामुळे आम्हीही सस्पेन्स कायम ठेवतो असं समाजवादी पक्षाचे प्रवक्ते नावेद सिद्धीकी यांनी सांगितले.

प्रियंका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तरी त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. उलट त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल असं मत भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी व्यक्त व्यक्त केलं. काँग्रेस आणि महाआघाडी आपल्या उमेदवाराची घोषणा का करत नाही असा सवालही त्यांनी केला. पराभवाची भीती असल्यानेच राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणुक लढवत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसचा सिक्रेट प्लॅन

उत्तर प्रदेशमधील हायप्रोफाईल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध काँग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवण्याचा विचार करत आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेस धक्का देण्याचा विचार करत आहे.

मोदींना घेरणार

गेल्या म्हणजेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देखील त्यांच्या विजयी मतांचे अंतर पाहता काँग्रेस सक्रीय झाले आहे. ज्या प्रमाणे राहुल गांधी यांना भाजपने अमेठीमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे मोदींना वाराणसीमध्ये घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अर्थात यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. वाराणसीतून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा करण्याआधी काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्याशी चर्चा करेल. या दोन्ही पक्षांकडून काँग्रेस पाठिंबा मागू शकते.

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवले होते तेव्हापासून वाराणसीमधील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी येथून निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत. काँग्रेसने प्रियांका गांधी यांना अद्याप उमेदवारी दिली नाही. आता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की PM मोदींनी घेरण्यासाठी काँग्रेस वाराणसी जागेतून त्यांना उमेदवारी देईल.

केजरीवालांचा पराभव

2014च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून वाराणसीत गेलेल्या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालांचा मोदींनी १ लाखहून अधिक मतांनी पराभव केला होता. तेव्हा काँग्रेसचे उमेदवार अजय राय हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. मोदींनी टक्कर देण्यात केजरीवाल यशस्वी झाले होते. त्यामुळेच काँग्रेस यंदा प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रश्न विचारले असता निवडणूक कोठून लढवायची याचा निर्णय स्वत: प्रियांकाच घेणार आहेत.

First published: April 18, 2019, 10:12 PM IST

ताज्या बातम्या