Loksabha election 2019 नरेंद्र मोदींनी फक्त घोषणाबाजी केली - प्रियंका गांधी

Loksabha election 2019 नरेंद्र मोदींनी फक्त घोषणाबाजी केली - प्रियंका गांधी

गंगा यात्रेच्या समारोप प्रसंगी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय.

  • Share this:

वाराणशी 20 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात काहीही काम झालं नाही अशी टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे. प्रियंका यांच्य गंगा यात्रेचा आज समारोप झाला. त्यावेळी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. काँग्रेस हा सामान्य माणसांचा पक्ष आहे आणि आम्ही कायम सामान्य माणसांसोबतच राहू असंही त्या म्हणाल्या.

तीन दिवस बोटींचा प्रवास करत प्रियंका आज मोदींचा मतदासंघ असलेल्या अस्सी घाट इथ पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन बाबा विश्वनाथांचं दर्शन घेतलं आणि पूजा केली. मोदींनी 2014 मध्ये वाराणशीसाठी 8 आश्वासने दिली होती मात्र त्यातलं एकही पूर्ण केलेलं नाही असंही त्या म्हणाल्या.

प्रियंकांनी सोमवारी प्रयागराज इथल्या बडा हनुमान मंदिर इथं विधीवत पुजा करत प्रचाराला सुरूवात केली. प्रियांका या प्रयागराज इथून  पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणशी इथे बोटीने आल्या. या तीन दिवसांच्या प्रवासात त्यांनी गंगा काठच्या गावांना भेटी दिल्या आणि लोकांशी संवाद साधला. या यात्रेला गंगा यात्रा असं नाव देण्यात आलं होतं.

काँग्रेसने प्रियंका यांच्या बडा हनुमान मंदिरातल्या पुजेचा फोटो ट्विट केला होता. प्रियंका गांधी यांच्या फोटोसोबत इंदिरा गांधींचा फोटोही काँग्रेसने जोडला होता. इंदिरा गांधी यांनी 1976मध्ये या मंदिरात पुजा केली होती. परम्पराएं, रीति-रिवाज़ कभी नहीं बदलते असं त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

140 किलोमीटरच्या या यात्रेत प्रियंकांनी विद्यार्थ्यांशी 'सांची बात' कार्यक्रम केला. मोदींच्या मन की बात च्या धर्तीवर 'सांची बात' हा उपक्रम आखण्यात आलाय. प्रियंका यांच्या या जलयात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ठिकठिकाणी माँ गंगा ने बुलाया है असे पोस्टर्सही लावले होते.

First published: March 20, 2019, 7:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading