नवी दिल्ली, 16 मे : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमिवर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमधील संघर्ष उफाळून आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीमध्ये गोंधळ झाला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये एक दिवस अगोदरच प्रचारबंदी करण्यात आली. या साऱ्या घडामोडींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पश्चिम बंगालमधील लोक नरेंद्र मोदी यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हात दाखवत आहेत. शिवाय, नरेंद्र मोदी देखील त्यांना प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्याला नरेंद्र मोदी यांनी 'ममता दीदींना हा व्हिडीओ आवडणार नाही' असं कॅप्शन देखील दिलं आहे.
ममता विरूद्ध मोदी, शहा
पश्चिम बंगलमध्ये ममता बॅनर्जी विरूद्ध नरेंद्र मोदी, अमित शहा असा सामना रंगलेला दिसत आहे. अमित शहा यांच्या रॅलीची रद्द केलेली परवानगी हे या वादाचं मुख्य कारण ठरलं. त्यानंतर अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर टिका देखील केली. तर, अमित शहा यांनी काढलेल्या रॅलीमध्ये गोंधळ झाल्यानंतर देखील दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी परस्परांवर शरसंधान साधलं.
'...तर या कारणास्तव फक्त VVPATची मतं धरली जातील ग्राह्य'
पश्चिम बंगालमध्ये एक दिवसापूर्वीच प्रचारबंदी
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त करत मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (14 मे) कोलकातामध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं कठोरातील कठोर पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी (16 मे) रात्रीपासूनच प्रचारबंदी लागू केली आहे. या कारवाईनुसार रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही पक्षाला येथे प्रचार करता येणार नाही. लोकसभा निवडणूक 2019च्या अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया 19 मे रोजी पार पडणार आहे. पण पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहता आयोगानं 17 मे ऐवजी 16 मे रोजीच प्रचारबंदी लागू केली आहे.
Election Commission: No election campaigning to be held in 9 parliamentary constituencies of West Bengal - Dum Dum, Barasat, Basirhat, Jaynagar, Mathurapur, Jadavpur, Diamond Harbour, South and North Kolkata from 10 pm tomorrow till the conclusion of polls. pic.twitter.com/cTpKS6jFwp
— ANI (@ANI) May 15, 2019
कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोगानं केलेली ही मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. याव्यतिरिक्त निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालच्या मुख्य आणि गृह सचिवांचीही पदावरून गच्छंती केली आहे.
ट्विटरवरील EXIT POLL बाबतचे ट्वीट हटवा; निवडणूक आयोगाचे आदेश
प्रियांका शर्मा प्रकरण
भाजपच्या युवा मोर्चाच्या नेत्या प्रियांका शर्मा यांनी ममता बॅनर्जीचा आक्षेपार्ह फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. त्यानंतर त्यांना अटक केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं ममता बॅनर्जींची माफी मागण्याचे सांगत जामीन देखील मंजूर केला. पण, प्रियांका यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला आहे.
डोंबिवली स्थानकाबाहेर महिलेला बेदम मारहाण, CCTV व्हिडीओ समोर